पुणे

उसने पैसे परत न केल्याने धनकवडीत मारहाण

CD

पुणे, ता. ६ ः उसने घेतलेले पैसे परत न केल्याने टोळक्याने दहशत माजवून महिला, तसेच तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना धनकवडीत घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. आरोपींबरोबर असलेल्या अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी रोहन सचिन यादव (वय २२, रा. महालक्ष्मी अपार्टमेंट, धनकवडी), अंगद अशोक साठे (वय २०, रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांसह चार अल्पवयीनांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडीतील शंकर महाराज वसाहतीत राहायला आहे. महिलेच्या पतीने उसने घेतलेल्या पैशांवरून आरोपींशी वाद झाला होता. त्यानंतर सोमवारी (ता. ४) पहाटे चारच्या सुमारास आरोपी यादव, साठे आणि साथीदार हे कोयते घेऊन शंकर महाराज वसाहतीत आले. आरोपींनी दहशत माजवून महिला, तसेच तिच्या पतीला शिवीगाळ केली. दहशत माजवून पसार झालेल्या दोघांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SA: पाकिस्तान संघाचा बँड बाजवण्यासाठी 'तो' येतोय! वन डे क्रिकेटमधील निवृत्ती घेतली मागे, आता शेजाऱ्यांचं काही खरं नाही

Latest Marathi News live Updates : बीड जिल्ह्यात ढगफुटी झाल्याने आणि गावांचा संपर्क तुटला

Buldhana: जिल्ह्यातील मोठ्यासह लहान प्रकल्प पाण्याने तुडूंब; वर्षभराकरिता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सिंचनासाठी होणार मदत

Solapur Flood: माढा तालुक्यातील राहूलनगर पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली; संपर्क तुटला!

Latur Flood: तेरणा नदीला पूर, रस्ते बंद अनेक, गावांचा संपर्क तुटला, राज्य मार्ग बंद; कोकळगाव, लिंबाळा बंधऱ्यावरून पाणी पडले

SCROLL FOR NEXT