पुणे, ता. २१ : पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने रास्तापेठ येथील कार्यालयात ‘एक खिडकी सुविधा’ उपलब्ध केली आहे. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे यांनी केले आहे.
हे लक्षात ठेवा
- गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी महापालिका किंवा स्थानिक स्वराज संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र, पोलिस परवानगी, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी अहवाल आदी कागदपत्रे आवश्यक
- रस्तापेठ पावर हाऊस येथील मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्रामध्ये पुणे शहरातील सर्व गणेश मंडळांचे अर्ज स्वीकारले जाणार
- यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता अविनाश लोखंडे (मोबाईल नंबर ७८७५७६७४९४) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
मंडळांना आवाहन
- गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारचा वीज अपघात होऊ नये, यासाठी मंडप, रोषणाई व देखाव्यांची उभारणी करताना लघुदाब व उच्चदाब विद्युत वाहिन्या, वितरण रोहित्रे आदी यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे
- मंडपातील वीजसंच मांडणी करताना विद्युत सुरक्षा नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
- विद्युत सुरक्षा उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये
- मंडपातील वीजसंच मांडणी मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडून करून घ्यावी
- आपत्कालीन स्थितीकरिता कार्यक्षेत्रातील महावितरणच्या स्थानिक शाखा अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावेत
- तात्पुरत्या वीजजोडणीसाठी गणेश मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक
- ही रक्कम ऑनलाइन भरल्यास गणेशोत्सव संपल्यावर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल
- त्यामुळे गणेश मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीनेच भरावी
एक खिडकी सुविधा केंद्राचा पत्ता
मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र
महावितरण, पावर हाऊस, तळमजला
रास्तापेठ, पुणे-११
संपर्क : अविनाश लोखंडे,
अतिरिक्त कार्यकारी अभियंता तथा नोडल अधिकारी,
मो. ७८७५७६७४९४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.