पुणे

वारी महाराष्ट्राच्या परंपरेतील अनमोल ठेवा ः डॉ. नेरकर

CD

पुणे, ता. २४ ः ‘‘सात्त्विक आहार, सात्त्विक विचारांचे पालन करणारा वारकरी संप्रदाय आणि पंढरपूरची वारी हा महाराष्ट्राच्या वैभवसंपन्न परंपरेतील अनमोल ठेवा आहे’, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर यांनी व्यक्त केले.
डीएसके विश्व ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने डीएसके विश्वमधील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात ‘मनामनाची मशागत करणारा वारकरी संप्रदाय’ या विषयावर डॉ. नेरकर यांचे व्याख्यान आणि गायिका चारुशीला बेलसरे यांच्या ‘पांडुरंगी मन रंगले’ या अभंग गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात विचार मांडताना नेरकर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाची पायाभरणी नीतिमूल्यांवर आधारित धार्मिक आणि तात्त्विक पायावर केली. कर्मकांडविरहित ज्ञानोतर भक्तीचा मार्ग तत्कालीन समाजात रुजवला.’’
अभंग गायन कार्यक्रमात बेलसरे यांनी ‘संतकृपा झाली इमारत फळा आली’, ‘खेळ मांडियेला’, विठू माझा लेकुरवाळा’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ आदी अभंग सादर केले. तसेच, ‘दिंडी चालली चालली’ या स्वरचित गीताचेही सादरीकरण केले. डॉ. अरविंद नेरकर यांनी निरूपण केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रत्नाकर फाटक यांनी स्वागत केले. कार्याध्यक्ष तेजस्विनी शिरोडकर यांनी प्रास्ताविक केले. सचिव विनायक जोशी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेवर शटडाऊनचं संकट! पैसे संपले, निधी मंजुरीला मतं पडली कमी; अनेक सरकारी सेवा बंद करण्याची वेळ

Flood Damage: दिवाळीनंतर फी देणार होतो, आता मुलांना काय सांगू... अख्खी बागच वाहून गेली, शेतकऱ्याने फोडला हंबरडा

Asia Cup Trophy Controversy : ट्रॉफीचा ड्रामा संपेना! नक्वींनी पुन्हा टीम इंडियाला डिवचलं, BCCIनेही सुनावले खडेबोल; ACCच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

Monsoon 2025 : सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस; माॅन्सूनचा परतीचा प्रवास लांबण्याचा अंदाज व्यक्त

Ajit Pawar: खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार; वार्षिक सर्वसाधारण बैठकीत शिक्कामोर्तब

SCROLL FOR NEXT