पुणे, ता. २१ : व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा इ.विषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ व ३० नोव्हेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, साधने व फर्टिगेशन, पाण्याची गुणवत्ता व अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती इ. प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्याघरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्युशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमानाचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे.
सरकारी बाजारपेठ प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करत आलेल्या विविध वस्तू आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई-बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. यावर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्थांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तूंची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारमधील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबतच मार्गदर्शन करणारे ऑनलाइन दोन आठवडे चालणारे प्रशिक्षण ८ डिसेंबरपासून आयोजिले आहे.
गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन प्रशिक्षण
सोसायटी मॅनेजर या करिअर संधीविषयीचे तीन दिवसीय प्रमाणपत्र प्रशिक्षण एसआयआयएलसी आणि पुणे हाउसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १९, २० व २१ डिसेंबरला आयोजिले आहे. यामध्ये सोसायटी मॅनेजरची कर्तव्ये, प्रोफाईल आणि जबाबदाऱ्या, मॅनेजिंग कमिटी अजेंडा व मिनिट्स लेखन, गृहनिर्माण संस्थेतील शेअर्स आणि व्याजाचे हस्तांतरण, देखभाल बिले तयार करणे, टीडीएस भरणे, ऑडिटसाठी चेकलिस्ट, लेखापरीक्षण अहवाल तयार करणे, सोसायटीचे वार्षिक विवरणपत्र सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना प्रात्यक्षिक अनुभवाची संधीही दिली जाणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास गृहनिर्माण संस्थांमध्ये सोसायटी व्यवस्थापक म्हणून अर्धवेळ किंवा पूर्णवेळ करिअर संधी उपलब्ध होऊ शकते अथवा गृहनिर्माण संस्थांना विविध सेवा देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.