अरोरा टॉवर्स परिसरातील
पार्किंग व्यवस्थेत बदल
पुणे, ता. २२ : लष्कर परिसरातील अरोरा टॉवर्स हॉटेलसमोरील नाज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकादरम्यानच्या पार्किंग व्यवस्थेत बदल करण्याचा आदेश वाहतूक शाखेने दिला आहे. यापूर्वी लागू असलेल्या दुचाकी पार्किंगच्या व्यवस्थेत बदल करून मोटारी आणि दुचाकींसाठी नवीन नियोजन लागू करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, उजव्या बाजूस दुचाकी लावण्याची पूर्वीची व्यवस्था रद्द केली आहे. त्याजागी दोनशे मीटर अंतरापर्यंत मोटारींच्या पार्किंगसाठी परवानगी दिली आहे. तर डाव्या बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत दुचाकी पार्किंगची व्यवस्था केली आहे. नागरिकांची मागणी आणि वाहतुकीतील अडथळे लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. नवीन पार्किंग रचनेबाबत काही सूचना किंवा हरकती असल्यास नागरिकांनी लेखी स्वरूपात वाहतूक शाखा मुख्य कार्यालय, येरवडा येथे पाठवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
-------