पुणे

तुम्ही पदार्थ खाता, की पदार्थ तुम्हाला खातो?

CD

ज्ञानेश्‍वर भोंडे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ : आजकाल चटपटीत, पाकीटबंद आणि झटपट मिळणाऱ्या औद्योगिक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थाने (अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड) लोकांच्या जेवणाची दिशा बदलून टाकली आहे. मोठ्या चवीसाठी हे पदार्थ खाणे सोपे असले, तरी त्यामागे लपलेले धोकेही मोठे आहेत. संशोधनानुसार, अशा पदार्थांमुळे स्थूलता, मधुमेह, हृदयरोग आणि यकृतविकार यांचा धोका वाढतो. खरेतर हे पदार्थ तुम्ही नव्हे, तर तेच तुम्हाला खात आहेत, अशी स्थिती आहे.
यासंबंधीचा अभ्यास ‘द लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. मोठमोठ्या कंपन्‍या या पदार्थांमध्‍ये औद्योगिक प्रक्रियेद्वारे उच्च फॅट, साखर, मीठ, कृत्रिम रंग-स्वाद यांसारखे विविध रासायनिक पदार्थ मोठ्या प्रमाणावर टाकतात. त्यांच्‍या आकर्षक आणि आक्रमक जाहिरातीही केल्‍या जातात, यामुळे त्‍यांना मागणीही मोठी आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्‍या (आयसीएमआर) अहवालानुसार, भारतात स्थूलतेबरोबरच मधुमेह, हृदयरोग आणि यकृतविकारांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्‍याला हे अन्नपदार्थ एक कारण ठरत असल्‍याचे ‘द लॅन्सेट’च्‍या संशोधन मालिकेत नमूद केले आहे.

हे पदार्थ प्रतिकारशक्तीवर परिणाम करतात आणि आजारांना आमंत्रण देतात. मुलांमध्येही अशा अन्नपदार्थांची आवड वाढत आहे. कंपन्या आक्रमक जाहिराती करतात. याबाबत सरकारने केवळ जागृती निर्माण करण्‍यावर अवलंबून न राहता, असे उत्‍पादने, जाहिरातींवर त्वरित निर्बंध आणणे आवश्यक आहे.
- डॉ. अरुण गुप्‍ता, बालरोगतज्ज्ञ व संशोधनाचे सहलेखक

भारतात या पदार्थांची विक्री गेल्या २० वर्षांत ४० पटीने वाढली आहे. हे अन्न पौष्टीकविरहित, व्यसन लावण्यासाठीच तयार केलेले असते. त्याच काळात पुरुष-महिलांमध्ये स्थूलताही दुप्पट झाली. आहाराची गुणवत्ता बिघडत असल्याचे आणि आजारांचा धोका वाढत असल्याचे स्पष्ट पुरावे ‘आयसीएमआर’ने दिले आहेत.
- शशिकांत अय्यंगार, मेटाबॉलिक हेल्थ इंडिया

औद्योगिक प्रक्रिया केलेले हे पदार्थ आपल्या पारंपरिक जेवणाची जागा घेत आहेत. अशा पाकिटांवर चेतावणी देणारे लेबल, चिन्‍हे लावणे, मुलांना लक्ष्य करणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध घालणे, शाळा व सार्वजनिक ठिकाणी अशा पदार्थांचे प्रमाण कमी करायला हवे. ताजे, साधे आणि कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ खाण्‍यास प्रोत्साहित करणे, आरोग्य धोरणांवर उद्योगाचा प्रभाव पडू न देणे, हेच पुढील पिढीचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याचे महत्त्वाचे पाऊल आहे.
- सुप्रीती दीक्षित, आहारतज्‍ज्ञ

काय आहे ‘अल्‍ट्रा-प्रोसेस्‍ड फूड’?
‘अल्‍ट्रा-प्रोसेस्‍ड फूड’ म्हणजे औद्योगिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करून बनवलेले अन्न असते. ते चव, सुगंध, रंग आणि त्‍याचा पोत आकर्षक वाटावा म्हणून विविध रासायनिक पदार्थांनी तयार केलेले असते. घरी किंवा हॉटेलमध्‍ये स्‍वयंपाकाद्वारे तयार होणाऱ्या या पदार्थांना प्रक्रिया केलेले, तर औद्योगिकरीत्‍या विविध रासायनिक घटकांचा समावेश करून तयार होतात. चिप्स, बिस्किटे, केक, पेस्ट्री, डोनट, पिझ्झा, कँडी, घरी शिजवून पाच मिनिटांत तयार होणारे नूडल्स, शीतपेये, कृत्रिम स्वादाची पेये आणि इतर पॅकबंद असलेल्‍या खाद्यपदार्थांचा समावेश होतो.

देशातील वाढते आरोग्य संकट
१) भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) २००८ ते २०२० या कालावधीत देशभरातील शहरी आणि ग्रामीण भागातील २० वर्षांपुढील एकूण एक लाख १३ हजार ४३ लोकसंख्येचे सर्वेक्षण केले
२) यापैकी ७९ हजार ग्रामीण, तर ३३ हजार शहरी भागांतील होते
३) त्‍याचा अहवाल २०२३ मध्ये प्रसिद्ध झाला
४) त्‍यानुसार, देशातील मधुमेह रुग्‍णांचे प्रमाण ११.४ टक्‍के, मधुमेहाच्या काठावर १५.३ टक्‍के, उच्च रक्तदाब ३५.५ टक्‍के, सामान्य स्थूलता २८.६ टक्‍के आणि पोटाभोवतीची स्थूलता ३९.५ टक्‍के आढळून आले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई स्टेशनवर अश्लील इशारे; तरुणीकडून विकृत व्यक्तीला चोप, व्हिडिओ व्हायरल

Gautam Gambhir: 'गॅरी कर्स्टन बनायला आला अन् चॅपेल बनला...' भारताला व्हाईटवॉश मिळाल्यानंतर गंभीर ट्रोल; मीम्सही व्हायरल

"सुकन्याची ऑडिशन पाहून मी.." रेणुका यांनी सांगितली खास आठवण ; म्हणाल्या...

'कंडोम खरेदी करण्यासाठी लोक लाजतात' काजोल आणि सोनाक्षीचं बोल्ड वक्तव्य चर्चेत, म्हणाल्या...'म्हणूनच एवढी लोकसंख्या...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील महिलेने केला पुरुषावर अत्याचार

SCROLL FOR NEXT