पुणे

दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सोमवारपासून

CD

पुणे, ता. १२ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून (ता. १५) सुरू होणार आहे. दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे अर्ज ‘युडायस प्लस’मधील पेन-आयडीवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळांमार्फत भरून घेण्यात येणार आहेत.
राज्य मंडळाच्या वतीने नियमित विद्यार्थ्यांसह पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत आणि तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे अशा विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेचे अर्ज ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळाप्रमुखांमार्फत भरायचे आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज १५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत भरता येणार आहेत, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
सर्व माध्यमिक शाळांनी अर्ज भरण्यापूर्वी स्कूल प्रोफाइलमध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरून सबमिट केल्यानंतर अर्ज भरायच्या कालावधीमध्ये माध्यमिक शाळांच्या लॉगिनमधून प्री-लिस्ट उपलब्ध करून दिलेली असेल. माध्यमिक शाळांनी त्याची प्रिंट काढून विद्यार्थ्यांमार्फत अर्जात नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. प्री-लिस्टच्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी, अशा सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. माध्यमिक शाळांनी परीक्षा शुल्क आरटीजीएसद्वारे भरावे आणि त्याची पावती, चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्री-लिस्ट जमा करावयाचा कालावधीनंतर कळविण्यात येईल, असेही राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT