पुणे

‘सकाळ-स्कूलिंपिक्स’ नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

CD

पुणे, ता. १४ ः शालेय विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा कौशल्यांना वाव देणाऱ्या आणि शाळा आणि पालकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘स्कूलिंपिक्स’ या आंतरशालेय क्रीडा स्पर्धेच्या नोंदणीला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पूनावाला फिनकॉर्प प्रस्तुत आणि ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ही आंतरशालेय क्रीडा स्पर्धा १४ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान पुण्यातील विविध क्रीडांगणावर आयोजित करण्यात येणार असून स्पर्धेचे हे आठवे वर्ष आहे.
मागील वर्षीप्रमाणेच शाळा व विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया ‘ऑनलाइन’ पद्धतीने आहे. स्पर्धेसाठी शाळांना व्यक्तिगत व सांघिक क्रीडा प्रकारासाठी नोंदणी करता येणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांनासुद्धा व्यक्तिगत क्रीडा प्रकारासाठी वैयक्तिक नोंदणी करता येणार आहे. वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेसाठीची नोंदणी प्रक्रिया schoolympics.com या लिंकद्वारे सुरू आहे.
पूनावाला फिनकॉर्प हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून मे. बी. जी. चितळे डेअरी व भैरवी प्युअर व्हेज हे फूड पार्टनर आहेत. याशिवाय अक्षरवेल मेडल पार्टनर, अभिजित कदम स्पोर्ट्स डेव्हलपमेंट सेंटर, भारती विद्यापीठ व ट्रिनिटी युनिवर्सिटी हे ग्राउंड पार्टनर आहेत. याचबरोबर डब्ल्यू १८ वेन्यू पार्टनर, स्पोर्ट्झ फर्स्ट टेक पार्टनर, एनपीएव्ही सायबर सेक्युरिटी पार्टनर व ब्लू रॅम्प हे सहयोगी पार्टनर आहेत.
स्पर्धेच्या माध्यमातून पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा व विद्यार्थ्यांना आपले क्रीडाकौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. ‘स्कूलिंपिक्स’ ही स्पर्धा २२ क्रीडा प्रकारांमध्ये आयोजिली जाणार असून, यामध्ये सात सांघिक आणि १५ वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. सांघिक गटातील स्पर्धा १० ते १६ वयोगटांतील मुला-मुलींसाठी आहे. वैयक्तिक क्रीडा प्रकारांसाठी १० ते १२, १२ ते १४ आणि १४ ते १६ असे तीन वयोगट असणार आहेत.
सांघिक क्रीडा प्रकारांत बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल या स्पर्धांचा समावेश असून, बॅडमिंटन, बॉक्‍सिंग, जिम्नॅस्टिक्‍स, ज्यूदो, तायक्वांदो, ॲथलेटिक्‍स, स्केटिंग, टेनिस, स्वीमिंग, टेबल टेनिस, कुस्ती, नेमबाजी, धनुर्विद्या, बुद्धिबळ, मल्लखांब आणि सायकलिंग अशा वैयक्तिक क्रीडा प्रकारांतील ४४१ हून अधिक स्पर्धांच्या फेऱ्या होणार आहेत. या स्पर्धेतून २४७९ पदके पटकावण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. गेल्या वर्षी ६५० शाळा व ३० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.

हे लक्षात ठेवा
नोंदणी शुल्क
१. वैयक्तिक क्रीडा प्रकार : रु. ३०० व ५००
२. सांघिक क्रीडा प्रकार : रु. ३०००

विजेत्या शाळांसाठी पारितोषिके (पदक गुण तक्त्याच्या आधारे)
१. विजेते - तीन लाख रुपये
२. प्रथम उपविजेते - दोन लाख रुपये
३. द्वितीय उपविजेते - एक लाख रुपये

स्पर्धेच्या नोंदणीसाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करता येईल.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९१५६२४७२००/९१५६२४८२००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant : उद्धव ठाकरेंसोबत जाणार की नाही, उदय सामंतानी कोडं सोडवलं? कोकणातील महायुतीबाबत वक्तव्य

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला कसं संपवलं, ४०० वर्षापूर्वींचं AI LIVE रिपोर्टींग व्हायरल, शिवभक्त असाल तर नक्की पाहा

Latest Marathi Breaking News Live: मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ!

Jalna News: आता नार्को चाचणी कराच; मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे पोलिसांना निवेदन

Uddhav Thackeray: शेती, संसार उद्‍ध्वस्त; पण मदतीची दमडीही नाही, ताडबोरगावात शेतकऱ्यांनी मांडली उद्धव ठाकरेंसमोर व्यथा

SCROLL FOR NEXT