पुणे

पुणे अडकले वाहतूक कोंडीत

CD

पुणे, ता. १५ : शहरात सोमवारी सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्यांना पुन्हा एकदा वाहतुकीच्या कोंडीचा त्रास सहन करावा लागला. शहरातील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही मिनिटांचा प्रवास तासाभराचा ठरला, तर अनेक ठिकाणी वाहनचालक कोंडीत अडकल्याचे पाहायला मिळाले.
शहरात सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सायंकाळी उशिरा पाणी ओसरल्यानंतर नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, बहुतांश वाहनचालकांनी नदीपात्र रस्ता परिसरातून जाण्याचे टाळले. परिणामी मध्य भागातील पेठांमधील रस्त्यांवर सायंकाळी वाहतूक कोंडी झाली होती. गणेशखिंड रस्त्यावर शिवाजीनगर, सीओईपी महाविद्यालय, रेंजहिल्स परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील कसबा पेठ ते स्वारगेटपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.

अशी होती स्थिती
- लोकमान्य टिळक रस्ता, डेक्कन जिमखाना, जंगली महाराज रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज उद्यान ते गरवारे चौकापर्यंत रस्त्यावर वाहतूक संथ गतीने
- कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता या महत्त्वाच्या मार्गांवर संध्याकाळी वाहतुकीची समस्या तीव्र झाली
- पूना हॉस्पिटल ते यशवंतराव चव्हाण पुलावर रात्री सातच्या सुमारास वाहतुकीचा खोळंबा
- हडपसर परिसरातील मगरपट्टा ते खराडी आणि सीझन मॉल ते मुंढवा मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
- वाहतुकीच्या खोळंब्यामुळे बसमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांची दमछाक
- उशीर झाल्याने विद्यार्थी व नोकरदारांना मन:स्ताप सहन करावा लागला

खड्डे अन् बॅरिकेड
छत्रपती शिवाजीनगर ते आचार्य आनंदऋषिजी चौकादरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. लोखंडी चेंबरच्या जाळ्या तुटल्या आहेत. रस्ता रुंदीकरण झाले असले तरी एबीएल हाउस, सेंट्रल मॉल, खैरेवाडी ते शिवाजीनगरपर्यंत मेट्रोच्या कामामुळे बॅरिकेड रस्त्यावरच आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT