पुणे

पाणंद रस्त्यांच्या क्राँक्रिटीकरणासाठी निधी द्यावा

CD

पुणे, ता. १६ : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या योजनेला प्रतिसाद देत पुरंदर तालुक्यातील आडाची वाडी गावातील रहिवाशांनी एकत्र येत सर्वप्रथम पाणंद रस्ते खुले केले. लोकवर्गणी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर फंड) तीन रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण केले आहे. उरलेल्या रस्त्यांसाठी राज्य सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या गावाच्या रहिवाशांनी मंगळवारी केली.
सर्व १५ पाणंद रस्ते खुले करणारे राज्यातील हे पहिले गाव ठरले आहे. दरम्यान, उद्यापासून (ता. १७) राज्यात महाराजस्व अभियानांतर्गत दोन ऑगस्टपर्यंत सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अभियानाचे उद्‍घाटन उद्या (ता. १७) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या गावातील शेतकरी सूर्यकांत पवार, दत्तात्रय पवार, हनुमंत पवार, नामदेव पवार, सचिन पवार आणि अनिल पवार यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
सेवा पंधरवड्याच्या उद्‍घाटनाचा समारंभात मुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांना भेटून आमच्या गावची यशोगाथा सादर करण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही विनंती केली आहे. या भेटीच्या वेळी मंत्र्यांना पाणंद रस्त्यांचा नकाशा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून त्यांना आदर्श गाव आडाची वाडीस भेटीचे निमंत्रण द्यायचे आहे. तसेच कार्यक्रमामध्ये आमच्या गावाच्या यशोगाथेचे सादरीकरण करण्याची संधी एका शेतकऱ्यास द्यावी, अशी विनंती केली आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Breaking News : समृद्धी महामार्गावर आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह

Rahul Gandhi : नियम म्हणजे नियम! बैठकीला दोन मिनिटं उशीर झाला, काँग्रेसनं राहुल गांधींना दिली शिक्षा....

IPL 2025: ब्रेव्हिस नाही, तर सॅमसनच्या बदल्यात CSK रवींद्र जडेजासह आणखी एक तगडा ऑलराऊंडरही राजस्थानला सोपवणार?

Khadakwasla Bridge : बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच; खडकवासल्यातील जीर्ण पुलावरील स्थिती; अपघाताचा धोका

कपड्यांच्या ट्रोलिंगवर काय असते देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया? अमृता फडणवीस म्हणाल्या...'जेव्हा मी त्यांना याविषयी...'

SCROLL FOR NEXT