पुणे

दिवाळी फराळ व्यवसाय संधी

CD

चटपटीत व स्वादिष्ट असा दिवाळी फराळ घरच्या घरी सोप्या पद्धतीने व झटपट बनवण्यास शिकवणारी तसेच याला व्यावसायिक रूप कसे द्यावे, यातून घरगुती दिवाळी फराळाचा व्यवसाय कसा सुरू करावा याबाबतही योग्य ते मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २७ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत रवा लाडू, बेसन लाडू (पाकाच्या प्रात्यक्षिकासह), चकली, चिरोटे, करंजी, कोल्हापुरी पुडाची वडी, शेव व शेवचे इतर प्रकार, पुणेरी बाकरवडी, तळीव चिवडा, पौष्टिक चिवडा, गुलमोहर चिवडा, गोड व खारे शंकरपाळे, बालुशाही व इतर असे दिवाळी विशेष फराळाचे प्रकार प्रात्यक्षिकांसह शिकवण्यात येणार आहे. पदार्थ रुचकर होण्यासाठी विविध टिप्स व सर्व पदार्थांच्या नोट्सही दिल्या जातील.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

बांधकाम व्यवसाय पर्यवेक्षक प्रशिक्षण
स्थापत्य अभियांत्रिकीची कोणतीही पार्श्‍वभूमी नसलेली व्यक्तीही योग्य प्रशिक्षणानंतर बांधकाम उद्योगात आपला व्यवसाय सुरू करू शकते अथवा करिअर घडवू शकते. या पार्श्‍वभूमीवर तीसस दिवसांचे प्रगत बांधकाम पर्यवेक्षक (कन्स्ट्रक्शन सुपरवायझर) प्रशिक्षण एक ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यामध्ये बांधकाम उद्योगात नोकरी मिळण्याची शक्यता वाढवणारे, स्थापत्य अभियांत्रिकीचे प्रगत ज्ञान देणारे, प्रात्यक्षिकांवर आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बांधकाम क्षेत्राचा परिचय, बांधकाम साहित्याचा परिचय, रेखाचित्राचे वाचन व प्रत्यक्ष साइटवर त्याचा सराव, क्षेत्र भेटी, प्रकल्प पूर्वतयारी, कंत्राटदाराच्या कामाची पद्धत, अंदाज व खर्च नियोजन, बांधकाम उद्योगातील १४ महत्त्वाच्या पायऱ्या, सुरक्षिततेसाठी घ्यायची खबरदारी व वेळेचे व्यवस्थापन इत्यादी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९७५७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी ४ महिन्यांत जाणार... जवळच्या व्यक्तीचा खळबळजनक दावा

Upper farmer:'उपरीतील शेतकऱ्यांचा बंधाऱ्यावरुन जीवघेणा प्रवास'; कासाळ ओढ्यावर पुलाची मागणी

Kunbi Note: 'साेलापूर जिल्ह्यात कुणबी नोंद असूनही वंशावळ सिद्ध करणे कठीण'; गाव, आडनाव जुळले तरी जुन्या कागदपत्रांअभावी मिळेना जात प्रमाणपत्र

Palghar Crime: 'बोईसर तारापूर खून प्रकरणातील दोघे आरोपींना अटक'; पोलिसांनी आरोपींना राजस्थान, मध्यप्रदेश व गुजरातमधून घेतले ताब्यात

Latest Marathi News Live Update : सासवड शहरात बँड पथकाच्या तालावर देखण्या सर्जा राजाची मिरवणूक

SCROLL FOR NEXT