पुणे

औद्योगिक क्रांतीत जनुकविज्ञानाचे महत्त्व

CD

पुणे, ता. २१ : ‘‘जनुकविज्ञान (जिनॉमिक्स) व मानवाचा जवळचा संबंध आहे. जनुकविज्ञानाच्‍या माध्यमातून अनेक गोष्टींचा उलगडा होणे शक्य झाले आहे. मानवाला भविष्यात होणारे आजार, त्यावर नवीन औषधोपचाराचे संशोधन करणे शक्य होणार आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये या विषयावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरु आहे. त्यामुळे जनुकविज्ञानाला पाचव्या औद्योगिक क्रांतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व राहणार आहे,’’ असे प्रतिपादन सिंबायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी केले.
वरिष्‍ठ स्त्रीरोग, प्रसूतीतज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते व इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे लिखित आणि रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘जिनॉमिक्स- मानवी जीवनाच्या अंतरंगाचा उलगडा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सेनापती बापट रस्त्यावरील सिंबायोसिसमधील विश्वभवनात रविवारी झालेल्या‍ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे संसर्गरोगतज्‍ज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. संजय गुप्ते, डॉ. अस्मिता गुप्ते, डॉ. अविनाश भोंडवे, रोहन प्रकाशनाचे संचालक रोहन चंपानेरकर हे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. संजय गुप्ते म्हणाले, ‘‘माणूस आणि चिम्पान्झी यांच्यामधील ९९ टक्के तर मांजर आणि माणूस यांच्यामध्ये ९० टक्के जनुक (जीन्‍स) सारखे आहेत. इतकेच नव्‍हे तर माशीमध्ये ६५ टक्के, केळींमधील ६० टक्के जनुक हे माणसाशी जुळतात. त्यामुळे प्राणिशास्त्र व वनस्पतीशास्त्राचे जवळचे नाते सिद्ध झालेले आहे. कालांतराने आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे? हे जनुकांच्या माध्यमातून ठरवणे शक्य होईल. त्‍याचबरोबर नोकरी करताना, खेळाडू म्हणून करिअर करतानाही या शास्त्राचा चांगला उपयोग होईल.’’
डॉ. भोंडवे यांनी जनुकविज्ञानाच्‍या माध्यमातून आपण कुठला आहार घ्यावा, त्‍याने काय फायदा होईल हे सुद्धा आपल्या जनुकावर अवलंबून असल्‍याचे सांगितले. तसेच व्‍यायाम सकाळी करायचा की सायंकाळी, हे देखील जनुकीय चाचण्‍यांद्वारे ठरवता येत असल्‍याचे ते म्हणाले. जनुकविज्ञान हा विषय प्रत्येकाला माहीत असणे महत्त्वाचे असल्‍याचे डॉ. गंगाखेडकर यांनी स्‍पष्‍ट केले. जनुकविज्ञान विषयावरील पुस्तक तयार करण्याची भूमिका रोहन चंपानेरकर यांनी विशद केली. सूत्रसंचालन डॉ. मंदार परांजपे यांनी केले तर श्रुती जावळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK, Asia Cup: अभिषेक शर्मा - शुभमन गिलच्या वादळाने पाकिस्तानचा उडवला धुव्वा; भारताचा सुपर फोरमध्ये पहिला विजय

IND vs PAK, Video: सुर्यकुमार यादवचा जुगाड! 'गार्डन'मध्ये फिरणाऱ्या पाकिस्तानी फलंदाजाला चतुराईने केले बाद

IND vs PAK Video: दोनदा चूक झाली, पण तिसऱ्यांदा अफलातून कॅच घेत अभिषेक शर्माची गर्जना; आक्रमक खेळणारा सैम आयुब कसा झाला आऊट?

Pune: गोधड्या धुण्यासाठी गेले, पाण्यात अनेकजण अडकले, तरुणांनी धाडस दाखवलं अन्...; खडकवासलातील थरारक प्रसंग

IIM Centre: 'आयआयएम मुंबईचे केंद्र आता पुण्यात';राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला मंजुरी; २०२६ पासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरू होणार

SCROLL FOR NEXT