पुणे

डॉ. हेमा साने अनंतात विलीन

CD

पुणे, ता. २२ ः ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. हेमा साने सोमवारी अनंतात विलीन झाल्या. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांच्या आप्तेष्टांसह विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. साने यांचे शुक्रवारी (ता. १९) वृद्धापकाळाने राहत्या घरी पहाटे निधन झाले होते. त्यांचे आप्तजन परदेशातून आल्यानंतर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वनस्पतिशास्त्रातील चालताबोलता ‘ज्ञानकोश’ अशी डॉ. साने यांची ओळख होती. पर्यावरणाचा अभ्यास करायचा म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होऊन राहायला हवे, म्हणून डॉ. साने यांनी तशीच जीवनशैली आयुष्यभर अंगीकारली होती. विजेशिवाय आपण राहू शकतो, हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिले. वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण विषयासह इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर जवळपास तीसहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Supply: कल्याण, टिटवाळा शहरांचा पाणीपुरवठा १२ तास बंद! कधी आणि का? जाणून घ्या

IPL 2026: सॅमसन CSK पूर्वी दिल्ली कॅपिटल्समध्ये जाणार होता, डिलही पक्की झालेली; पण राजस्थानच्या 'या' मागणीमुळे सगळंच फिस्कटलं

इरफानने हॅप्पी पंजाबी बनून केली मैत्री, हॉटेलमध्ये अत्याचार; ब्लॅकमेल करत पुन्हा पुन्हा संबंध ठेवले, गर्भपात करवला

Latest Marathi Breaking News : आठव्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू

श्रीनाथ केसरी स्पर्धेवेळी बैलगाड्या उधळल्या, गर्दीत घुसल्या; वृद्धाचा मृत्यू, १३ जखमी

SCROLL FOR NEXT