पुणे

पुणे विमानतळावर ‘कॅट ३ बी’ यंत्रणेचा अभाव

CD

प्रसाद कानडे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : पावसाळ्यात पावसामुळे व हिवाळ्यात दाट धुक्यामुळे पुणे विमानतळावरील विमानसेवा वारंवार विस्कळित होते. वैमानिकांना मार्गदर्शन करणारी ‘कॅट ३ बी’ ही अद्ययावत यंत्रणा येथे नसल्याने वैमानिकांना धावपट्टीवरील महत्त्वाची मार्किंग दिसत नाही. परिणामी त्यांना पुण्याऐवजी अन्य विमानतळ गाठावे लागत आहे. याचा फटका थेट प्रवाशांना बसतो.
पुणे विमानतळावर गेल्या सोमवारी ४६ विमानांची सेवा बाधित झाली. पुण्यात मुसळधार पाऊस झाल्याने याचा थेट परिणाम विमान वाहतुकीवर झाला. १८ विमानांचा मार्ग बदलला, २० विमानांना उशीर झाला तर आठ विमाने रद्द झाली. कमी दृश्यमानता व हवा हे याचे प्रमुख कारण होते. ‘कॅट ३ बी’ यंत्रणेमुळे कमी दृश्यमानता असताना देखील विमान उतरविणे शक्य होते. सध्या पुणे विमानतळावर ‘कॅट २’ ही यंत्रणा आहे. जर पुणे विमानतळावर अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित केली तर विमानांची सेवा बाधित होण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
विमान उतरविण्याच्या (लँडिंग) दोन पद्धतीपैकी एक म्हणजे आधुनिक यंत्राचा वापर करण्यात येणारी ‘आयएलएस’ (इन्स्ट्रुमेंटल लँडिंग सिस्टीम) पद्धत. यात देखील खराब हवामानात सुरक्षित लँडिंगसाठी ‘कॅट ३ बी’ ही यंत्रणा फार मोलाची ठरते. सध्या देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर याच प्रणालीचा वापर केला जात आहे. पुणे हे देशांतील १० महत्त्वाच्या विमानतळांपैकी एक आहे. मात्र असे असले तरीही अद्यापही पुणे विमानतळावर ही प्रणाली बसविण्यात आलेली नाही. त्यामुळे खराब हवामान तयार झाल्यावर त्याचा थेट फटका प्रवाशांना बसतो. विमाने रद्द होणे, उशिराने उतरणे, दुसऱ्या विमानतळावर उतरविणे आदी प्रकारांना तोंड द्यावे लागते.

‘कॅट ३ बी’ म्हणजे काय?
विमानांना मार्गदर्शन करणारी साधने किंवा प्रणालीचे (रेडिओ नेव्हिगेशनल एड्स) विविध प्रकार असून यातील सर्वांत अद्ययावत व उच्च दर्जाचा प्रकार म्हणून ‘आयएलएस’ला ओळखले जाते. हे रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून वैमानिकांना संदेश देतात. पुणे विमानतळावर आयएलएस यंत्रणा आहे. मात्र सर्वात प्रगत मानली जाणारी ‘कॅट ३ बी’ ही प्रणाली नाही. ‘कॅट ३ बी’ अत्युच्च दर्जाची संदेश वहन प्रणाली आहे. जी विमानाला धुके, पाऊस, धूर किंवा कमी दृश्यमानता असताना सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरायला मदत करते.

‘कॅट ३ बी’ची वैशिष्ट्ये
- धावपट्टीवरील दृश्यमानता ५० ते १७५ मीटरपर्यंत असली तरीही विमान सुरक्षितपणे उतरवता येते.
- विमान उतरविण्यासाठी स्वयंचलित लँडिंग प्रणालीचा वापर.

फायदा काय?
- धुक्यात अथवा कमी दृश्यमानतेतही विमान उतरू शकते.
- प्रवाशांचा वेळ वाचतो.
- विमानांचे उड्डाण रद्द किंवा वळवावे लागत नाही.
- एअरलाईन्सचे इंधन व पैसे वाचतात.
- विमान दुसऱ्या विमानतळावर वळविण्याचा खर्च कमी होतो.
- अचूक मार्गदर्शनामुळे अपघाताची शक्यता कमी.

पुणे विमानतळाच्या धावपट्टीवरील यंत्रणेचा आढावा घेतला जाईल. सध्या पुणे विमानतळावर ‘कॅट २’ ही यंत्रणा आहे. खराब हवामानात सुरक्षित लँडिंग व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘कॅट ३ बी’ ही यंत्रणा असणे आवश्यक असेल तर नक्कीच याबाबत सकारात्मक विचार केला जाईल.
- मुरलीधर मोहोळ,
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री

पुणे विमानतळावर नागरी उड्डाणांची वाढती संख्या, मर्यादित पार्किंग बे, एक कोटीपेक्षा जास्त वार्षिक प्रवाशांची वाहतूक आहे. कमी दृश्यमानतेमुळे विमानांच्या मार्गात बदल अथवा रद्द झाल्यास प्रवासी व विमान कंपन्यांचे मोठे नुकसान होते. परिणामी ‘कॅट ३ बी’ आयएलएस प्रणाली असणे आवश्यक आहे. त्यामुळे विमानतळावरील संचालनात्मक सुरक्षा अधिक सक्षम होण्यास मदत
होते.
- धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: आनंदाची बातमी! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १० अतिरिक्त ट्रेन चालवणार, २ नवीन स्थानके सुरू होणार

Viral Video: प्राजक्ता माळीचे योगासने पाहिले का? सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Astrology Prediction : कितीही प्रयत्न करा 'या' राशीच्या लोकांचं लग्न टिकत नाही! आयुष्यभर राहतो तणाव..पाहा 'या' जोड्या कोणत्या?

Latest Marathi Breaking News Live: बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक

Ozar Municipal Election : ओझरची निवडणूक फिरणार कदम काका-पुतण्याभोवती! आमदार बनकरांची भूमिका निर्णायक; इच्छुकांची भाऊगर्दी, अपक्षही वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT