पुणे, ता. २३ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे प्राथमिक शाळेत व १९८८ मधील इयत्ता चौथीच्या माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेत भावे प्राथमिक शाळेने उत्तम कामगिरी केली आहे. इयत्ता पहिली ते चौथी गटामध्ये झालेल्या स्पर्धेत शाळेने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच तन्वी मोटे हिने प्रभावी वाचनातून प्रेक्षकांचे मन जिंकले आणि तिला उत्कृष्ट वाचक हा विशेष पुरस्कार मिळाला. माजी विद्यार्थी सिद्धार्थ महाशब्दे व डॉ. मानसी भाटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. सहशिक्षिका रेणुका महाजन यांनी परिश्रम केले. मुख्याध्यापिका प्रतिभा गायकवाड आणि उपमुख्याध्यापिका वृषाली ठकार यांनी शिक्षिकांचे कौतुक केले.