पुणे

‘सिंबायोसिस’च्या प्राध्यापकांचा ‘ग्लोबल वैज्ञानिक रँकिंग’मध्ये समावेश

CD

पुणे, ता. २४ : सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातील १९ प्राध्यापक आणि एक प्रॅक्टिसचे प्राध्यापक यांचा समावेश ‘स्टॅनफोर्ड’ विद्यापीठाच्या जागतिक सर्वोत्कृष्ट दोन टक्के वैज्ञानिकांच्या यादीत झाला आहे.
ही यादी ‘स्टॅनफोर्ड’ विद्यापीठ आणि ‘एलसिव्हीयर’ यांनी ‘स्कोपस डेटा’वर (डिसेंबर २०२४ पर्यंत) आधारित आहे. यात जगभरातील ८० लाखांहून अधिक वैज्ञानिकांचे मूल्यांकन करण्यात आले असून, २२ विज्ञान आणि १७४ उपक्षेत्रे यांचा समावेश आहे. यंदा या यादीत भारतातील सहा हजार २३९ वैज्ञानिकांचा समावेश आहे. ही यादी संशोधनातील प्रभाव, सायटेशन आणि इतर वैज्ञानिक निकषांवर आधारित आहे. सिंबायोसिस विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या, ‘‘ही मान्यता सिंबायोसिसमधील संशोधकांचा जागतिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रातील प्रभाव दर्शवते.’’
या यादीत सिंबायोसिसमधील पवन बुढवार, जसजित सुरी, रामकृष्णन रमण, केतन कोटेचा, दीपाशा शर्मा, दीपक जैन, कृती गुप्ता, व्ही. जी. वेंकटेश, धन्या प्रामोद, राजेश धनराज, श्रुती पाटील, शैलेश रस्तोगी, सुमन त्रिपाठी, पी. अशोक, शिल्पा गीते, अनिल जाधव, सुमीत कुमार, अशोक कुमार यादव, अखिल गुप्ता, संदीप साळवी (प्रॅक्टिसचे प्राध्यापक) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard In Hotel : ब्रेकिंग! कोल्हापुरातील हॉटेलमध्ये घुसला बिबट्या ! दोघांवर केला जीवघेणा हल्ला, वनरक्षक जखमी

दिल्लीत स्फोटानंतर मी रात्रभर....; PM मोदींनी अतिरेक्यांना दिला कडक इशारा, भूतानला जाण्याबद्दल दिलं स्पष्टीकरण?

Rohit Sharma: 'मेरे यार की शादी...' रोहितनं स्वत:च गाणं वाजवत डान्स करून नवरा-नवरीला केलं शॉक; Video Viral

Latest Marathi Breaking News : दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

MPSC: हजारो उमेदवारांचा तीन वर्षांचा संघर्ष वाया; लिपिक टंकलेखक भरतीची प्रतीक्षा यादी न लावल्याने उमेदवारांचा संताप

SCROLL FOR NEXT