पुणे

पुण्यात ‘गरबा-दांडिया नाईट्स’चा जल्लोष

CD

राधिका वळसे पाटील ः सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. २६ : मोकळ्या मैदानांवर झगमगत्या दिव्यांचा वर्षाव, हिंदी-गुजराती गाण्यांचा ठेका आणि हातात दांडिया घेऊन आकर्षक घागरा चोळी, कुर्ता-पायजमा परिधान केलेली तरुणाई असे दृश्‍य सध्या शहराच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळत आहे. नवरात्रीनिमित्त शहरातील देवींच्या मंदिराबाहेर केली सजावट, विद्युत रोषणाई, ठिकठिकाणी रंगतदार दांडिया-गरब्याचे कार्यक्रम आयोजित केल्याने सगळीकडे जल्लोषी माहोल दिसू लागला आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमांची पोस्टर्स, व्हिडिओ आणि सेलिब्रिटींची उपस्थितीची घोषणा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्यासाठी नोंदणी, पासेस, कपड्यांच्या खरेदीसाठी तरुणाईसाठी लगबग चालू आहे
ठिकठिकाणी होणाऱ्या दांडिया इव्हेंट्ससाठी आयोजकांकडून आकर्षक नियोजन होत आहे. दांडिया नाइट्ससाठी शहरातील सर्व तरुण मंडळी उत्साहित आहेत, कार्यक्रमांसाठी लागणारी नाव
या इव्हेंट्सचे नियोजन अत्यंत भव्य आणि व्यावसायिक पद्धतीने केले जाते. मोठे मैदान, आकर्षक रोषणाई, उच्च दर्जाची साउंड सिस्टीम तसेच फूड कोर्ट, सेल्फी पॉइंट्स, सुरक्षेच्या कडक उपाययोजना, लाइव्ह बँड, सुप्रसिद्ध डीजे गरब्याचे पारंपरिक आणि आधुनिक रिमिक्स गाणे सादर केली जातात. काही इव्हेंट्समध्ये सेलिब्रिटींची विशेष हजेरीदेखील असते, ज्यामुळे आयोजनाला ग्लॅमरस टच मिळतो. सोशल मीडियावर या इव्हेंट्सचे आकर्षक पोस्टर झळकत आहेत, ज्यामुळे तरुणांमध्ये याबद्दलची क्रेझ आणखी वाढली आहे. या इव्हेंट्ससाठी प्रवेश पासेस घेतले जात असून, पासेसचे दर हे ३०० रुपयांपासून १५०० पर्यंत असतात, तर काही ठिकाणी मोफत प्रवेशदेखील दिला जातो. बऱ्याच ठिकाणी अनेक आयोजक ग्रुप बुकिंग घेतल्यास विशेष सवलत देतात. तसेच शुल्क भरलेल्या काही इव्हेंट्समध्ये दांडिया स्टिक्स, स्नॅक्सही पुरवले जाते. पारंपरिक लायटिंग, राजस्थानी-गुजराती साजशृंगार आणि बॉलिवूड टच असलेल्या डेकोरेशनमुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरत आहेत.

दांडिया नाइट्समध्ये पोशाखालाही विशेष महत्त्व असते. महिलांसाठी रंगीबेरंगी घागरा-चोली, कुर्ता-पायजमा, गुजराती लेहेंगा, घागरा, विविध प्रकारच्या ओढणी किंवा गुजराती फ्युजन ड्रेस हे कपडे भाड्याने मिळत असून, ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी, बांगड्या आणि आकर्षक दागिनेही रेंटवर उपलब्ध आहेत, तर पुरुषांसाठी ही रंगीबेरंगी केडिया-धोतीचे, पायजमा किंवा पारंपरिक गुजराती कपड्यांचे पर्याय विकत तसेच भाड्याने उपलब्ध आहेत. त्याचे भाडे एका दिवसासाठी ५०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत आहे

नवरात्रीनिमित्त यंदा महिलांसाठी खूप आकर्षक घागरा, लेहेंगा, ओढणी तसेच फ्युजनवेअरसाठी वर्क केलेले स्कर्ट, ब्लाउजदेखील विविध रंगांमध्ये बाजारात विकत तसेच भाडेतत्त्वावर उपलब्ध आहेत. त्या पोषाखासोबत आम्ही त्यावर साजेसे दागिनेदेखील देतो. आजकाल जास्तीतजास्त महिला भाडेतत्त्वावर कपडे घ्यायला प्राधान्य देत असून, ते आर्थिकदृष्ट्या परवडते आणि महिलांना व्हरायटी मिळते.
- रेणुका थोरात, भाडेतत्त्वावर कपडे देणाऱ्या व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav: भारतीय कर्णधारावर ICC ने कारवाई केली, BCCI ची सटकली! थोपटले दंड, प्रकरण आता आणखी तापणार...

Visa Free Countries: व्हिसा फ्री प्रवास करायचा आहे? या ५८ देशांमध्ये फिरा एकदम बिनधास्त, मिळवा संपूर्ण यादी एका क्लिकवर!

आलाय 'टीजर' व्हा 'हजर'..!! ‘वेल डन आई’ची प्रेक्षकांना उत्सुकता; विशाखा सुभेदार दिसणार हटके भूमिकेत

Kolhapur News : पूरग्रस्तांसाठी आमदार अमल महाडिक यांचा मदतीचा हात! स्वखर्चातून दिले १५०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

IND vs SL Live: जसप्रीत बुमराहसह अष्टपैलू खेळाडूला विश्रांती; दोन बदलांसह टीम इंडिया श्रीलंकेचा सामना करणार

SCROLL FOR NEXT