पुणे

अपहृत चिमुरडी सुखरूप पालकांच्या स्वाधीन

CD

पुणे, ता. २४ : विमाननगर परिसरातून अपहरण झालेली तीन वर्षांची चिमुरडी विमानतळ पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे अवघ्या चार तासांत सुखरूप सापडली. याप्रकरणी पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकावरून दोघांना अटक केली.
प्रिन्स संजय पाल (वय २१) आणि ओमनारायण छोटेलाल पासवान (वय २०, दोघे रा. विमाननगर, मूळ बिहार) अशी अटक आरोपींची नावे आहेत. फिर्यादीने त्यांची लहान मुलगी २२ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता असल्याची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. फिर्यादीने पूर्वी कामावरून काढून टाकलेल्या प्रिन्स आणि ओमनारायण यांनीच मुलीचे अपहरण केल्याची शक्यता व्यक्त केली. तक्रार मिळताच अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांनी पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली. लेबर कॅम्प परिसरातील ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले. आरोपींचे मोबाईल ‘सीडीआर’ आणि लोकेशन मिळवून तपास सुरू केला. सुरुवातीला आरोपींचे लोकेशन तळेगाव दाभाडे परिसरात आले, त्यानंतर लोणावळा भागात आढळले. रेल्वे मार्गे पळ काढत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी मुंबईच्या दिशेने पथक रवाना केले.
तपासादरम्यान आरोपी इंद्रायणी एक्स्प्रेसने प्रवास करत असल्याचे निष्पन्न झाले. तत्काळ रेल्वे पोलिसांना आरोपी आणि मुलीचे छायाचित्र पाठवले. कल्याण रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रिन्स आणि ओमनारायण यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चिमुरडी सुखरूप परत मिळाली असून, तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत माने तपास करीत आहेत.
वरिष्ठ निरीक्षक गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या सूचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड यांच्यासह अंकुश जोगदंडे, लालू कन्हे, रूपेश पिसाळ, राकेश चांदेकर, शैलेश नाईक, सचिन मांजरे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, श्रीमंत यंपाळे, ज्ञानदेव आवारी, हरिप्रसाद पुंडे, शंकर वाघुले यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Pune River Pollution : नद्यांच्या डोळ्यांत 'पाणी', शुद्धीकरण प्रकल्पांच्या अपुऱ्या कामांमुळे मुळा-मुठात मैलापाणी

Panjabrao Deshmukh Scholarship : पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती बंद? ‘सारथी’कडून प्रक्रियेचा प्रारंभ नाही; मराठा विद्यार्थ्यांतून नाराजी

हृदयद्रावक घटना! एकाच कुटुंबातील चौघांनी विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; पाण्यावर तरंगत होते मुलांचे मृतदेह, असं काय घडलं?

Tejas Fighter Jet Crash: वडील युट्यूबवर एअर शोचे व्हिडिओ स्क्रोल करत होते... तेवढ्यात विंग कमांडर मुलाच्या मृत्यूची बातमी कळली

SCROLL FOR NEXT