पुणे

पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे मदतीचा ओघ सुरू

CD

पुणे, ता. २५ ः आपद्‍ग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाण्याची परंपरा ‘सकाळ रिलीफ फंड’ने कायम ठेवत समाजाला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला समाजातील दानशूरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मराठवाड्यातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, जालना आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरसह राज्यातील इतर काही जिल्ह्यांमधील अनेक मंडळात सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर येऊन अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे. याशिवाय अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे शेतांमध्ये चिखल झाला असून, खरिपाची पिके उद्‍ध्वस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यामुळे काही ठिकाणी शेती व जनावरे वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

सेवानिवृत्त परिचारिकेची एक लाखाची देणगी
पुण्यातील खराडी परिसरात वास्तव्यास असलेल्या व ससून रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या परिचारिका श्रीमती शकुंतला थोरात यांनी पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची देणगी ‘सकाळ रिलीफ फंड’ला दिली.

यांनी केली सढळ हस्ते मदत
आशिष दातार, कचरू गणगे, राहुल गायकवाड व विठ्ठल देशवंदीकर यांनी प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत केली आहे. उन्मेष भामरे, अमर तुपे, पांडुरंग महालदार, सारंग बाळ, राजमल फुलफागर, सुनील देशपांडे व अनिलकुमार शहा यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत केली. याशिवाय बिभीषण शेवडे यांनी तीन हजार रुपयांची मदत केली आहे. नितीन वाघ, रूपाली साने व श्यामसुंदर मोरे यांनी प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली आहे, तसेच चंद्रकांत हिवरकर यांनी दोन हजार शंभर रुपयांची मदत केली.
याचबरोबर एस. एस. पलमकर, तुळशीराम नागे, सुधाकर घारे, राजेश पाषाणकर, कचरदास उदावंत, हेमंत माळी, योगेश भांगे, दिलीप चुडेकर, शेकर काळे व विलास सिद्ध यांनी प्रत्येकी एक हजार रुपयांची मदत केली आहे. संजय बाळंदे यांनी एक हजार शंभर व प्रसाद गद्रे यांनी एक हजार १११ रुपयांची मदत केली असून, विजय काकडे, जय माळी, एस. जी. पत्की, सागर एडके व संदीप गडसिंग यांनी प्रत्येकी पाचशे रुपयांची मदत केली.

मदत करण्यासाठी
१. IDBI Bank
Name : Sakal Relief Fund
A/C No : 45910010013026
IFSC : IBKL0000459
Branch : Bajirao Road, Pune.
या खात्यावर देणगीची रक्कम ऑनलाइन पद्धतीने बँक ट्रान्स्फर करून देणगी देऊ शकता. देणगी बँक खात्यात ट्रान्स्फर केल्यानंतर ८६०५०१७३६६ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर ट्रान्सझॅक्शन तपशील पाठवावेत.
२. मदतीचे धनादेश ‘सकाळ रिलीफ फंड’ या नावाने दैनिक ‘सकाळ’च्या कार्यालयात ११ ते ५ या वेळेत स्वीकारले जातील.
३. ‘सकाळ रिलीफ फंड’साठीच्या देणग्या प्राप्तिकर कायद्याच्या ‘८० जी’ कलमाअंतर्गत प्राप्तिकर सवलतीस पात्र आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: हिंसक कारवाईची मोठी किंमत! हत्याकांड प्रकरणी शेख हसीना दोषी; बांगलादेश न्यायालयाकडून मृत्युदंडाची शिक्षा

Latest Marathi Breaking News: पालघर-संभाजीनगर बसला अपघात, 25हून अधिक प्रवासी जखमी

Ironman Competition: 'पांगरीच्या अजय दडस यांचे आयर्नमॅन स्पर्धेत यश'; गोव्यातील स्पर्धेत ३३ देशांतील सुमारे १३०० खेळाडू सहभागी

Viral Jugaad Video : चाक नसतानाही सुस्साट धावू लागला टेम्पो, जुगाडाचा बादशहा ठरला ड्रायव्हर; व्हिडिओ पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Pushkar Singh Dhami : सीएम धामींनी संरक्षण मंत्र्यांसमोर ठेवल्या सामरिक महत्त्वाच्या मागण्या; नंदा राजजात यात्रेच्या मार्गावरही केली चर्चा

SCROLL FOR NEXT