पुणे

बौद्धिक भांडवल ही आपली खरी ताकद ‘पीआयसी’ वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे प्रतिपादन

CD

पुणे, ता. २६ : ‘‘पुण्यात ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर होण्याची मोठी क्षमता आहे. आपली खरी ताकद बौद्धिक भांडवलात आहे. डावोसने जागतिक स्तरावर केलेल्या कार्याप्रमाणेच आपण ‘ब्रेन पॉवर’ च्या माध्यमातून विलक्षण परिणाम साधू शकतो, याची जाणीव ठेवून मानसिकतेत बदल करणे आवश्यक आहे, असे मत पुणे इंटरनॅशनल सेंटरचे (पीआयसी) अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
‘पीआयसी’ चा १४ वा वर्धापन दिन नव्या पाषाण कॅम्पसवर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर नेते, संशोधक आणि धोरणकर्ते सहभागी झाले. संस्थेच्या स्थापनेपासून झालेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला. तसेच पीआयसी २.० च्या आगामी वाटचालीची दिशा निश्चित करण्यात आली. डॉ. माशेलकर यांनी पीआयसीच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा मागोवा घेतला. परिसंवादात डॉ. माशेलकर यांच्यासोबत ‘पीआयसी’चे महासचिव प्रशांत गिरबाने, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे, प्रा. अभय पेटे, ‘पीआयसी’चे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, तसेच ‘पीआयसी’च्या विश्वस्त व सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर सहभागी झाले होते.
या चर्चेत ‘पीआयसी २.०’ ही बौद्धिक काटेकोरपणा, नावीन्य आणि साधनसंपन्नतेवर आधारित उत्कृष्टतेकडे वाटचाल करणारी संस्था म्हणून उभी राहील, अशी कल्पना डॉ. माशेलकर यांनी व्यक्त केली. गिरबाने यांनी युवा वर्ग व महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढविण्याचे तसेच संस्थेच्या उपक्रमांचा व्यापक प्रचार करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
डॉ. रानडे यांनी आपला वैयक्तिक अनुभव सांगताना १९०५ मध्ये पुण्यात स्थापन झालेल्या ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’ तसेच ‘ऍपल इन्कॉर्पोरेशन’च्या प्रारंभीच्या संघर्षाचा उल्लेख केला. लहान सुरवात मोठ्या परिवर्तनशील संस्थांमध्ये कशी रूपांतरित होते, हे अधोरेखित केले. चर्चेचे सूत्रसंचालन पीआयसीचे संचालक मेजर जनरल (निवृत्त) नितीन गडकरी यांनी केले.

फोटोः 53989

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT