पुणे

श्री गुरू तेग बहादूर जयंतीनिमित्त बुधवारी यात्रा

CD

पुणे, ता. २६ ः शिखांचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर साहीब यांच्या ३५०व्या शहीद दिवसानिमित्त शताब्दी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (ता. १) ही यात्रा पुण्यात येणार असल्याची माहिती गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
बुधवारी दुपारी चार वाजता ही यात्रा देहूरोड येथील गुरुद्वारा सिंह सभा येथे पोहोचणार आहे. त्यानंतर नगर कीर्तनाच्या स्वरूपात आकुर्डी येथील गुरुद्वारा मानसरोवर येथे पोहोचणार असून तेथे मुक्काम करणार आहे. त्यानंतर गुरुवारी (ता. २) सकाळी पिंपरी बाजार येथून यात्रा पुढे जाणार असून खडकी येथे गुरुद्वारा सिंह सभा येथे लंगर सेवेसाठी थांबणार आहे. तेथून यात्रा गुरुद्वारा दशमेश दरबार आणि साधू वासवानी मिशनमार्गे कॅम्प येथील गुरुद्वारा गुरू नानक दरबारपर्यंत कीर्तनाच्या स्वरूपात जाणार असल्याचे चरणजितसिंग सहानी यांनी सांगितले. ‘‘गुरू तेग बहादूर साहीब जी यांच्या सर्वोच्च हौतात्म्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक स्तरावर विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ही शताब्दी यात्रा त्याचाच भाग आहे,’’ असे सहानी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: आत्मघातकी हल्ला नाही! सुरक्षा यंत्रणांच्या दबावामुळे गडबडीत केला स्फोट; अपुऱ्या क्षमतेचा ब्लास्ट, सूत्रांची माहिती

Balapur Crime : शिक्षकाकडून पाच विद्यार्थीनींना ‘बॅडटच’ नवेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार!

Latest Marathi Breaking News : खोपोलीत मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेने बैलाला उडवलं, वाहतूक खोळंबली

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंवर आगामी निवडणुकांसाठी भाजपने सोपवली महत्त्वाची जबाबदारी!

Marathwada Politics : कन्नड नगरपरिषदेच्या केंद्र निहाय मतदार याद्या अद्यापही प्रसिध्द नाही!

SCROLL FOR NEXT