पुणे, ता. २८ ः आपल्या भावना एकमेकांना पत्र लिहून व्यक्त करण्याची पद्धत कालबाह्य होत चालली आहे. मात्र, पत्र म्हणजे फक्त कागदावरचे शब्द नसतात, तर ते मने जुळवणारा पूल असतो. प्रेम, आपुलकी, कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पत्रे लिहिण्याची गोडी लागावी, हस्ताक्षर सुधारावे यासाठी भोर तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’ला पत्रे पाठवली आहेत.
आळंदे येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, येवली येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, आळंदेवाडी येथील शाळा,
अमृतराव बांदल माध्यमिक विद्यालय येवली सांगवी, अप्पासाहेब बांदल विद्यालय, आळंदे. स्वामी समर्थ केंद्र व स्वामी समर्थ सेवेकरी व्हॉटस् ग्रुप यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.
यातील अमृतराव बांदल विद्यालयाचा नववीतील विद्यार्थी प्रदीप खंडाळे याने पत्रात लिहिले आहे, की ‘ताज्या घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या, सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींची माहिती ‘सकाळ’मधून मिळते. त्यामुळे घरबसल्या जग फिरून आल्यासारखे वाटते.’ श्रावणी बांदल या नववीतील विद्यार्थिनीने लिहिले आहे, की ‘सकाळ’मुळे मला ताज्या घडामोडींची माहिती मिळते. त्यातूनच मला वाचनाची आवड निर्माण झाली आहे.
दहावीतील समृद्धी पन्हाळकर हिने लिहिले आहे, की दररोज ‘सकाळ’ वाचल्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडते. त्यामुळे मला वर्तमानपत्राबरोबरच अवांतर वाचनाची गोडी लागली आहे.
यातील अनेक विद्यार्थ्यांनी ‘सकाळ’चे संस्थापक- संपादक नानासाहेब परुळेकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. ‘सकाळ’च्या शताब्दीसाठी विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या.
‘उत्कृष्ट पत्रलेखन’ अशी स्पर्धा यावेळी घेण्यात आली. यात आरोही किरण शिर्के (आळंदे), प्रज्ञा विकास खंडाळे (सांगवी), ईश्वरी चंद्रकांत धावले (आळंदे), सर्वेश खंडाळे (येवली), श्रेया सुनील जाधव (आळंदेवाडी) विजेते ठरले. त्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
किरण खंडाळे, सुनील गायकवाड, मिलिंद काकडे, सुभाष सणस, माधुरी राजेशिर्के, दत्तात्रेय गोरक्षनाथ पांगारे, विष्णू भाऊसाहेब बाठे, रामदास लक्ष्मण साळवे, दीपाली गोरे, पूजा कल्पेश सणस, सतीश बरदाडे, अर्जुन पोटभरे, डी. एस. गायकवाड, संजय तनपुरे, माया तळेकर, दयानंद मस्के आदी शिक्षक व ग्रामस्थांनी या उपक्रमास मोलाची मदत केली.
‘‘मुलांना पत्रे लिहिण्याची गोडी लागावी तसेच त्यांचे हस्ताक्षर सुधारावे, यासाठी स्वामी समर्थ केंद्राने उपक्रमाचे आयोजन केले होते. ‘सकाळ’ला पत्र लिहा, असा विषय त्यांना दिला होता. त्यानुसार त्यांनी स्वयंस्फूर्तीने पत्रलेखन केले आहे.’’
-संतोष कदम, संयोजक, पत्रलेखन स्पर्धा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.