पुणे, ता. २६ ः आपण पूर्वी महाविकास आघाडीमध्ये होतो, आता महायुतीमध्ये आहोत. त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण स्वतंत्रपणे तर गरज पडल्यास एकत्रही लढत होतो. पक्ष संघटना वाढवण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे सांगत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, भूविकास बॅंकेचे माजी अध्यक्ष मुरलीधर निंबाळकर, स्वाती चिटणीस यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष सुभाष जगताप, सुनील टिंगरे, आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार रमेश थोरात, संभाजी कुंजीर, महादेव बाबर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे यांच्यासह पक्षाचे नेते, माजी नगरसेवक उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘जिंकण्याची क्षमता पाहूनच तिकीट दिले जाईल. मात्र हे करतानाच संघटनात्मक जबाबदारी देखील पार पाडली पाहिजे. आता वरवर काम करू नका, मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो, किमान माझ्या कामाच्या निम्मे तरी काम करा. आरोग्य सेवा, सहकारी संस्था, जिल्हा बॅंक, महापालिका, जिल्हा परिषदेची कामे उत्तम पद्धतीने चालतील, याकडे लक्ष द्या.’’
-----------------
पवार म्हणाले,
- ज्यांच्यासोबत राहायचे, त्यांच्यासोबत निष्ठेने रहा
- वरवर कामे न करता जनतेच्या मूळ प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्या
- मला राज्यात फिरावे लागेल, तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडा
-शिरूरमध्ये अशोक पवार यांना सांगून पाडले, माऊली कटके यांना निवडून आणले
-----------
पूर्वी पांघरुन घालायला शरद पवार होते
उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वतःमध्ये केलेल्या बदलांची कार्यकर्त्यांना माहिती देत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मार्गदर्शन केले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आवर्जून आठवण काढली. ते म्हणाले, ‘‘मागचा अजित पवार आणि आत्ताचा अजित पवार यात खूप फरक आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माझ्याकडे येताना घाबरू नका. वय वाढले की माणसात परिपक्वता येते. आपण पूर्वी काही केले, तर पांघरून घालायला शरद पवार असायचे, आता आपल्यालाच पांघरून घालायचे आहे.’’
---------
फोटो ः 54454
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.