पुणे

सणासुदीत सुवर्णलंकार खरेदीची पर्वणी

CD

सणासुदीत सुवर्णालंकार खरेदीची पर्वणी
नवरात्र, दसरा, दिवाळी, धनत्रयोदशी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया यांसारख्या सणांमध्ये सोन्या-चांदीच्या खरेदीला शुभ मानले जाते. याच परंपरेला आधुनिक गुंतवणुकीचे भान मिळाल्याने गेल्या काही वर्षांत सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या खरेदीचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सणांमध्ये सोने व चांदीची खरेदी ही केवळ खरेदी-विक्री किंवा गुंतवणूक नाही, तर ती श्रद्धा, परंपरा, सुरक्षितता आणि सामाजिक मूल्यांचा संगम आहे.
- रीना महामुनी-पतंगे

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करता-करता दसरा-दिवाळी लवकर येते आणि सुरू होते खरेदीची लगबग. इतर खरेदीबरोबरच सोन्या-चांदीची खरेदीही आलीच. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोने, चांदी, मोती, डायमंडच्या दागिन्यांमध्ये नेकलेस, बांगड्या, झुमके, टॉप्स, पेंडेंट, ब्रेसलेट, छल्ला, कमरपट्टा, बाजूबंद, अंगठी, भिकबाळी असे स्त्री-पुरुषांचे सर्वच दागिने उपलब्ध आहेत.
खरंतर पूर्वी फक्त लग्नसराईच्या वेळीच ही खरेदी होत असे. आता मात्र सणवार आले की सोनेखरेदीला निमित्तच मिळते. त्यात दसरा, दिवाळी, पाडवा म्हणजे खरेदीला निमित्त देणारा सण! त्यात सोने-चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिले जाते. हे सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे कोणतेही मंगलकार्य करावयाचे असल्यास या मुहूर्तावर सुरू केले जाते. म्हणूनच सोने-चांदी खरेदीसाठीही सणाला विशेष महत्त्व आहे. दसरा-दिवाळीच्या निमित्ताने झगमगणाऱ्या पेढ्यांमध्ये वैविध्यपूर्ण सुवर्णालंकारांची रेलचेल दिसून येते. भारतीय संस्कृतीत सोने व चांदीला केवळ दागिने किंवा संपत्तीचे प्रतीक म्हणून पाहिले जात नाही, तर ते शुभ, समृद्धीचे व दीर्घकाळ टिकणाऱ्या गुंतवणुकीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच विविध सण-उत्सवांमध्ये यांची खरेदी करणे हा भारतीय परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. कारण हिंदू धर्मग्रंथांमध्ये सोने व चांदीला दैवी तेज व शुद्धतेचे प्रतीक मानले गेले आहे. सोने हे सूर्याचे, तर चांदी हे चंद्राचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे हे धातू शक्ती आणि शांती या दोन्ही गुणांचा समतोल साधतात. सणांमध्ये सोने-चांदी खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते, अशी श्रद्धा आहे.
गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असतो. या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं; कारण ते वर्षभर घरात ऐश्‍वर्य व आनंद आणतं. अनेक कुटुंबांमध्ये लहानसहान सोन्याचे नाणे, अंगठी किंवा कानातील खरेदी करण्याची परंपरा आहे. अक्षय तृतीयेला सोन्या-चांदीच्या खरेदीसाठी सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. ‘अक्षय’ म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेली खरेदी कधीही कमी न होता वाढतच राहते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी सोन्याचे दागिने, बिस्किटे, नाणी तर चांदीच्या वस्तू, पूजा साहित्याची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. नागपंचमी व श्रावण महिन्यात पूजेसाठी चांदीच्या नाग-नागिणीच्या प्रतिकृती खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी चांदीच्या वस्तूंना धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असते. गणेशोत्सवात गणेशपूजेसाठी चांदीच्या मूर्ती, दागिने, व्रतांसाठी लागणारी भांडी खरेदी केली जातात. चतुर्थीला केलेली अशी खरेदी घरात सुख-समृद्धी आणते, असे मानले जाते. नवरात्र व दसऱ्यात अष्टमी-नवमीला सोन्याचा वापर ‘कन्या पूजनात’ केला जातो. दसऱ्याच्या दिवशी ‘सोनं’ (आपट्याची पाने) वाटण्याची प्रथा असून त्याच दिवशी सोनं खरेदी करणं विशेष शुभ मानलं जातं. तसेच दिवाळी हा सोनं-चांदी खरेदीचा सर्वांत मोठा सण. धनत्रयोदशीला सोन्याची व चांदीची खरेदी केली तर घरात लक्ष्मीचे आगमन होते, अशी श्रद्धा आहे. या दिवशी सोन्याचे नाणे, दागिने तर चांदीची पूजा भांडी, लक्ष्मी-गणपतीच्या मूर्ती खरेदी केल्या जातात. मकरसंक्रांतीला काळ्या वस्त्रांसोबत सोन्याचे दागिने वापरण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी रामनवमी, होळी व इतर प्रादेशिक सणांनिमित्तही सोन्या-चांदीच्या देवपूजेसाठी खरेदी केली जाते. याशिवाय पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेमुळे या खरेदीला भावनिक मूल्यही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swami Chaitanyanand Saraswati : स्वामी चैतन्यानंद सरस्वती याला ५ दिवसांचा पोलिस कोठडी; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा झटका

IND vs PAK Final: ICC ने दंड ठोठावल्यावर सुधारला पाकिस्तानी ओपनर, पण आऊट होताच भडकला अन्...; VIDEO

Balasaheb Thorat: संकटातील बळीराजाला कर्जमाफी द्या : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; सरकारला गांभीर्य नाही

IND vs PAK Final Live: जसप्रीत बुमराहने स्पेल संपवला, आता भारताची वाढणार डोकेदुखी? ८ फलंदाजांसह उतरलेत, कोण उचलणार 'डेथ ओव्हर'चा भार?

Amit Shah: देशातून नक्षलवाद कधी नष्ट होणार? अमित शहांनी मोठी घोषणा करत थेट तारीखच सांगितली, म्हणाले...

SCROLL FOR NEXT