पुणे

आज पुण्यात २८ सप्टेंबर २०२५ रविवार

CD

आज पुण्यात २८ सप्टेंबर २०२५ रविवार
....................................................
आज पुण्यात २८ सप्टेंबर २०२५ रविवार
...................................................
सकाळी ः
परिषद व पुरस्कार वितरण ः शाक्त शिवराज्याभिषेक दिन, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष ः सत्यशोधक विचार यात्रा ः उद्‍घाटन सत्र ः हस्ते- महेश झगडे ः स्वागताध्यक्ष- अण्णासाहेब थोरात ः सत्यशोधक शिक्षक पुरस्कार ः पुरस्कारार्थी- डॉ. बाबा आढाव ः हस्ते- उत्तमराव पाटील ः वैचारिक संवाद सत्र ः श्रीमंत खासेसाहेब पवार सभागृह, श्री शिवाजी मराठा सोसायटी, शुक्रवार पेठ ः ९.००.
नवरात्र उत्सव ः हिंदू महिला सभेतर्फे ः देवी याग ः हस्ते- श्रुती व प्रतीक पोळेकर ः बालचमूंचे गीतरामायण ः सादरकर्त्या- भाग्यश्री केसकर ः शिवाजी मंदिर, सदाशिव पेठ ः ९.००.
गीत आनंदमठ ः डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन आयोजित ः ‘संगीत आनंदमठ’ नाटकातील गीतांची मैफील ः सहभाग- अनुष्का आपटे, वज्रांग आफळे, अनुजा जोशी व अन्य ः स्मरमयी गुरुकुल, छत्रपती उद्यानासमोर, शिवाजीनगर ः १०.००.
फिल्म फेस्टिव्हल ः मुंबा फिल्म फाउंडेशनतर्फे ः राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः नादरूप संस्थेतर्फे ः ‘नृत्यमय जग... नर्तनाचा धर्म’ या शमा भाटे एक नृत्यप्रवास या पुस्तकाचे प्रकाशन ः प्रमुख पाहुण्या- डॉ. अरुणा ढेरे ः ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रस्ता ः १०.००.
पेनांचे प्रदर्शन ः द इंक अँड पेन्स आयोजित ः द फाउंटन पेन शो ः उद्‍घाटन हस्ते- दिलीप कर्णिक ः वन प्लेस, ज्ञानेश्वर पादुका चौक, फर्ग्युसन रस्ता ः १०.३०.
पुरस्कार आणि गप्पा ः सारद मजकूर आयोजित ः मुळातून माणूस- पुरस्कार आणि गप्पा ः पुरस्कारार्थी- भरत चोरघे आणि महेश चोरघे ः एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ ः १०.३०.
चर्चासत्र ः संभाषा फाउंडेशन आयोजित ः विदर्भातील विस्मृत महापाषाणीय स्थळ- ‘खैरवाडा’ या पुस्तकावर आधारित चर्चासत्र ः सहभाग- डॉ. मंजिरी भालेराव, डॉ. ग. का. माने, डॉ. श्रीकांत गणवीर, हेमंत दळवी ः प्रबोध समागृह, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला, सदाशिव पेठ ः ११.००.
दुपारी ः
नवरात्र उत्सव ः भवानी देवी मंदिर आयोजित ः नवरात्रोत्सवात भजनी मंडळांचा कार्यक्रम व मंत्रजागर ः श्री भवानी देवी मंदिर, भवानी पेठ ः २.३०.
सांगीतिक कार्यक्रम ः झपुर्झा म्युझिअम ऑफ आर्ट अँड कल्चरतर्फे ः ‘कलर्स ऑफ रागाज’ कार्यक्रम ः रागांवर आधारित खयाल, बंदिश, तराणा, गझल, सूफी, भक्तिसंगीत ते चित्रपट गीत ः सादरकर्त्या- डॉ. कल्याणी बोंद्रे ः झपुर्झा म्युझिअम ऑफ आर्ट अँड कल्चर, खुडजे ः ३.००.
वास्तू स्थलांतर ः यश ब्रेन क्लिनिक अँड व्हर्टिगो सेंटरचे नवीन जागेत स्थलांतर ः अधयक्ष- छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले ः हस्ते- डॉ. सुधीर कोठारी ः शांग्रिला गार्डन, सी विंग, तिसरा मजला, बंड गार्डन ः ४.००.
पारितोषिक वितरण ः मुस्लिम सत्यशोधक मंडळ, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त ः राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि सत्कार समारंभ ः हस्ते- डॉ. मिलिंद जोशी ः प्रमुख पाहुणे- लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. भाऊसाहेब जाधव ः मराठवाडा मित्रमंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय, डेक्कन जिमखाना ः ४.००.
सायंकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः राष्ट्र सेवा दल, महाराष्ट्र आयोजित ः ‘स्त्री-शक्तीचा जागर’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- सुशीलाबाई रूपवते ः स्त्रीशक्ती सन्मान सोहळा ः उपस्थिती- राजा कांदळकर, ॲड. संघराज रूपवते, हिरालाल पगवाड ः अध्यक्ष- अजित शिंदे ः संस्थेचे नाथ पै सभागृह, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा ः ५.००
नवरात्र उत्सव ः श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग आयोजित ः बक्षीस वितरण समारंभ व भजनांचा कार्यक्रम (आम्ही सेवेकरी मंडळ) ः महालक्ष्मी मंदिर, सारसबाग ः ५.००.
पुरस्कार वितरण ः भारत इतिहास संशोधक मंडळ व सरदार आबासाहेब मुजुमदार कुटुंबीयांतर्फे ः सरदार कै. गंगाधर नारायण ऊर्फ आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कार ः पुरस्कारार्थी- राजेंद्र जोशी ः मुजुमदार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण ः अध्यक्ष- अविनाश धर्माधिकारी ः उपस्थिती- अनुपमा मुजुमदार ः भारत इतिहास संशोधक मंडळाचे वि. का. राजवाडे सभागृह ः ५.३०.
पुरस्कार वितरण ः शिरीष थिएटर आयोजित ः भारतरत्न लता मंगेशकर (दीदी) यांची ९६ वी जयंती ः लतादीदी पुरस्कार प्रदान सोहळा ः पुरस्कारार्थी- मधुरा दातार ः हस्ते- पं. हृदयनाथ मंगेशकर ः हिंदी-मराठी संगीतमय कार्यक्रम ः ‘मी लता दीनानाथ...’ ः प्रमुख पाहुणे- श्री आशिष शेलार, सुशील कुलकर्णी, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी ः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड ः ५.३०.
शास्त्रीय संगीत सभा ः डॉ. प्रभा अत्रे यांना समर्पित शास्त्रीय संगीत सभा ः प्रमुख उपस्थिती- राम कोल्हटकर ः कलाकार- डॉ. साधना शिलेदार ः स्वरमयी गुरुकुल, हॉटेल शिवसागर लेन, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर ः ६.००.
नवरात्र उत्सव ः शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित ः पुणे लोकमान्य फेस्टिव्हल ः स्वरसम्राज्ञी- लतादीदींच्या ९५ वाढदिवसानिमित्त स्वरांजली ः गायक- अर्चना पोतनीस, रश्मी बडे. संजय पोतनीस ः लोकमान्यनगर, जॉगिंग पार्क, नवी पेठ ः ७.००.
शारदीय नवरात्र ः अशोक चौक मित्र मंडळ, नाना पेठ आयोजित ः बालमेळावा ः ११०, नाना पेठ, अशोक चौक ः ७.००.
नवरात्र महोत्सव ः यंग भोर्डे आळी मित्रमंडळातर्फे ः सार्वजनिक नवरात्र महोत्सव ः महाआरती ः हस्ते- कालिपुत्र कालिचरण महाराज ः ३८५, नाना पेठ, भोर्डे आळी ः ७.३०.
.......................................................

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळने 'पासपोर्ट'साठी दिला अहिल्यानगरचा पत्ता; पोलिस येणार अडचणीत

Madha News : अडाणी बापलेकांनी स्वतः दोन दिवस कोणत्याही निवाऱ्याशिवाय पावसात थांबून सुमारे २०० जनावरांचे वाचवले जीव

PMRDA DP Issue : पीएमआरडीएचा डीपी रद्द; राज्य शासनाने काढली अधिसूचना

SCROLL FOR NEXT