पुणे

कर्ज मंजुरीच्या आमिषाने ८९ लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. २७ : कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिकाची ८९ लाख १३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सनदी लेखापालासह तिघांना पर्वती पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी सनदी लेखापाल सिद्धार्थ जयराम गावडे (वय ३८, रा. आंबेगाव), विकास दामोदर खुडे (वय ४३, रा. भारती विद्यापीठ परिसर, कात्रज) आणि पंढरीनाथ बाळासाहेब साबळे (वय ४४, रा. नऱ्हे, सिंहगड रस्ता) यांना अटक केली असून एका महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिक तरुणाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांच्या पत्नीला व्यवसायासाठी सात कोटी रुपयांचे कर्ज हवे होते. त्यावेळी गावडेने त्यांना सात कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवीत कर्ज मंजुरीसाठी काही पैसे भरावे लागतील, असे सांगितले. गावडे याने एका पतसंस्थेकडून कर्ज मंजूर करून देतो, असे सांगितले होते, अशी माहिती पर्वती ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी दिली.
गावडे याचे पुणे-सातारा रस्त्यावर कार्यालय आहे. गावडे याच्या खात्यावर काही रक्कम व्यावसायिक दाम्पत्याने जमा केली, तसेच त्याच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली. व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडून गावडे आणि साथीदारांनी कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने वेळोवेळी ८९ लाख १३ हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतर कर्ज मंजूर करून दिले नाही. कर्ज न दिल्याने व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीने विचारणा केली. तेव्हा गावडे आणि साथीदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Eknath Shinde : अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Parli Vaijnath News : तालुक्यात आभाळ फाटले, तीन मंडळात अतिवृष्टी; गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले, शेतातील पिकांत पाणीच पाणी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

SCROLL FOR NEXT