पुणे

पीएमपीएमएलची सुरक्षा ‘ती’च्या हाती

CD

इलेक्ट्रीशियन क्षेत्रामध्ये एकेकाळी पुरुषांचे वर्चस्व होते. आता हे चित्र बदलले आहे. या क्षेत्रातही महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. विशेष म्हणजे यात ग्रामीण भागांतील महिलांची संख्या लक्षणीय आहे. यातील एक नाव म्हणजे पूजा पाटील. त्या पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपीएमएल) कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या गुंतागुंतीच्या कामाचे आव्हान पेलले आहे. बसमधील इलेक्ट्रीक बिघाड शोधणे, बसची देखभाल दुरुस्तीसह इतरही कामे करून नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी त्या झटत असतात.
या मूळच्या नाशिकच्या आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण सिन्नर येथे झाले. आयटीआय (इलेक्ट्रिशियन) त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील संस्थेतून पूर्ण केले. त्या म्हणाल्या की, आयटीआयमध्ये मुलांची संख्या अधिक असते. मी आयटीआय करू शकते का? कोणता ट्रेड घेतला तर उपयोगी पडले असे विविध प्रश्‍न मनामध्ये निर्माण होत होते. अशावेळी तेथील शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले. तू आयटीआय करू शकते, असा आत्मविश्वास त्यांच्या शब्दांमुळे निर्माण झाला. मग मी सुद्धा निश्‍चय केला आणि आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. दहावीच्या परिक्षेनंतर दोन वर्षांत आयटीआयचे शिक्षण पूर्ण झाले. दरम्यानच्या काळात पीएमपीएमएलमध्ये सरळ सेवेतून इलेक्ट्रीशियनच्या जागा भरणार असल्याची माहिती मिळाली. २०१९ मध्ये माझी निवडही झाली. सुरवातीला हेल्पर म्हणून काम सुरु केले. त्यानंतर मी इलेक्ट्रीशियनचे काम करू लागले. गेली सहा वर्षे मी पीएमपीएमएलच्या पिंपरी आगारात कार्यरत आहे. सध्या टाटा कंपनीच्या संगणक प्रणालीच्या (सॉफ्टवेअर) मदतीने बसमधील बिघाड शोधण्यात येतो. त्यानंतर सेन्सर दुरुस्ती, बॅटरीची देखभाल दुरुस्ती, स्टार्टर अल्टरनेटर बदलणे, इतर देखभाल दुरुस्तीपर्यंतची सर्व कामे मी करते.
विशेष म्हणजे पूजा पाटील यांनी नोकरी करता करता बी.ए चे शिक्षणही बाहेरून पूर्ण केले आहे. या आव्हानात्मक क्षेत्रातील कामाबद्दल त्यांना काही पुरस्कारही मिळाले आहेत.
(शब्दांकन ः अविनाश ढगे)
----------
कोणतीही गोष्ट छोटी समजू नये. मुलीही मॅकेनीकलचे काम करू शकतात. आयटीआय करूनही चांगले करिअर करता येऊ शकते. मुलींनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.
- पूजा पाटील
----------
पुरस्कार
- २०२० मध्ये उत्कृष्ट कामगार
- २०२३ चा दुर्गा ब्रिगेडचा पुरस्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy rally तामिळ सुपरस्टार विजयच्या रॅलीत प्रचंड चेंगराचेंगरी; ३५ मृत्यू, ७० जण जखमी

Eknath Shinde : अतिवृष्टीच्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Parli Vaijnath News : तालुक्यात आभाळ फाटले, तीन मंडळात अतिवृष्टी; गेल्या तीस वर्षांचे पावसाने रेकॉर्ड तोडले, शेतातील पिकांत पाणीच पाणी

Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार

Khokya Bhosle: खोक्या भोसलेवर आता 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई; जामीन मिळताच हर्सूल कारगृहात रवानगी

SCROLL FOR NEXT