पुणे

सासू, नणंद, पतीच्या मित्राचा जामीन अर्ज फेटाळला

CD

पुणे, ता. २८ : केवळ नऊ महिन्यांच्या बाळाची आई दबावाशिवाय टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही. आरोपींवर कटकारस्थान रचणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावे नष्ट करणे असे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आरोपींना जामिनावर सोडल्यास साथीदारांवर दबाव येण्याची किंवा पुराव्यात छेडछाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हुंडाबळी हा समाजावरचा मोठा कलंक आहे, अशी निरीक्षणे नोंदवीत हुंड्यासाठी मानसिक-शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिची सासू, नणंद आणि पतीच्या मित्राचा जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळला.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.पी. क्षीरसागर यांनी हा आदेश दिला. वैष्णवीची सासू लता राजेंद्र हगवणे (वय ५४), नणंद करिष्मा राजेंद्र हगवणे (वय २१, दोघी रा. भुकूम, मुळशी) आणि नीलेश रामचंद्र चव्हाण (वय ३५, रा. कर्वेनगर) अशी जामीन फेटाळलेल्या आरोपींची नावे आहेत. हुंडा व जमीन खरेदी करण्यासाठी सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुळशी) यांनी १६ मेला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ६३), सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि वैष्णवीच्या बाळाला बेकायदा ताब्यात ठेवून तिच्या नातेवाइकांना पिस्तूल दाखवून धमकावणारा नीलेश चव्हाण यांच्यासह अन्य पाच आरोपींविरोधात बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या लता, करिष्मा आणि नीलेशने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याला विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार आणि तक्रारदाराचे वकील अॅड. शिवम निंबाळकर यांनी विरोध केला.

वैष्णवीचा छळ होत असल्याचे निदर्शनास

शवविच्छेदन अहवालात वैष्णवी यांच्या अंगावर ३० जखमा आढळून आल्या असून, ११ ते १६ मेदरम्यान तिचा सातत्याने छळ केला जात होता. तीने सासरी आत्महत्या केली आहे. व्हॉट्सअप चॅटिंग, साक्षीदारांची साक्ष यावरून वैष्णवी यांचा सातत्याने छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोपी नीलेश हुंड्याच्या प्रत्येक चर्चेवेळी उपस्थित होता. त्याने शशांक व करिष्माच्या मोबाईलमधील सीमकार्ड नष्ट केले. कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारातून करिष्मा आणि नीलेशमधील निकटचे नाते लक्षात येते, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील व तक्रारदारांच्या वकिलांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: छक्केनेही कप जिताया! पाकिस्तानच्या नांगी ठेचणारा तिलक वर्माचा सिक्स अन् गौतम गंभीरची नादखुळी रिऍक्शन; Video

IND vs PAK Final : सूर्यकुमार यादवने मोहसिन नक्वीकडून ट्रॉफी स्वीकारण्यास दिला नकार; पाकिस्तानी खेळाडूंची ड्रेसिंग रुममधून बाहेर येण्यास टाळाटाळ, फुल ड्रामा

IND vs PAK Final : भारताने पाकड्यांना ठेचले! २१ दिवसांत तिसऱ्यांदा वस्त्रहरण करून जिंकला आशिया चषक; शेजारी तोंड लपवताना दिसले

IND vs PAK: बुमराहने काढलं बुक्कीत टेंगूळ! यॉर्करवर हॅरिस रौफचा 'दांडा' उडवला अन् प्लेन क्रॅशचं चोख उत्तर, Celebration Video Viral

Thane: ठाणे बनणार वेगवान वाहतुकीचे 'मल्टीमोडल' जंक्शन! बुलेट ट्रेन स्थानकाला रेल्वे, मेट्रो, अंतर्गत मेट्रो जोडणार, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT