पुणे

पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुंडाला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

CD

पुणे, ता. २९ ः रिक्षात गाणी ऐकत थांबलेल्या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करून पसार झालेल्या गुंडाला वानवडी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.
ऋषिकेश सुनील बागूल (वय २७, रा. एसआरए वसाहत, शिंदे वस्ती, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका रिक्षाचालकाने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार रिक्षाचालक हा चार जुलैला एसआरए वसाहतीच्या आवारात रिक्षातील ध्वनिवर्धक यंत्रणेवर गाणी ऐकत थांबला होता. तो नातेवाइकांची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी आरोपी ऋषिकेश बागूल आणि साथीदार तेथे आले. त्यांनी रिक्षातील ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करण्यास सांगितले. या कारणावरून वाद झाला. त्यानंतर बागूल आणि साथीदारांनी रिक्षाचालकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. रिक्षाचालकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बागूलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेनंतर बागूलबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी बागूल हा पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. पसार झालेला बागूल हा छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. वैजापूर बस स्थानक परिसरात सापळा लावून त्याला अटक करण्यात आली. बागूल हा सराईत गुन्हेगार असून, यापूर्वी त्याच्याविरुद्ध हडपसर, शिवाजीनगर आणि फरासखाना पोलिस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SSC HSC Exam Form : दहावी-बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Viral Video : पतीसोबत गरबा खेळताना अचानक कोसळली महिला अन्... हृदयद्रावक व्हिडिओ

Pune News : ११६ कोटीची जमीन नाममात्र दरात हस्तांतरित करा; अजित पवारांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Phulambri News : फुलंब्रीत तिहेरी मृत्यूच्या घटना! विद्युत शॉक, गळफास व विषारी औषधाने तिघांचा बळी

Latest Marathi News Live Update : पंजाबमधील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांनी जाहीर केले पॅकेज

SCROLL FOR NEXT