पुणे, ता. २९ : एक हजार १११ हून अधिक शंखवादकांचा विश्वविक्रम, त्यासोबतच १२ प्रकारच्या विविध शंखनादांसह, कमीतकमी वय ४ वर्षे असलेला शंखवादक ते जास्तीतजास्त वय ८४ वर्षे असलेला शंखवादक, अशा विविध प्रवर्गात विश्वविक्रम करण्याचा उपक्रम केशव शंखनाद पथकातर्फे रविवारी (ता. ५) सकाळी ८.३० वाजता टिळक रस्त्यावरील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० जयंती वर्ष, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन ३७५वे वर्ष, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे ३५१वे वर्ष, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे ३००वे जयंती वर्ष, महात्मा जोतिराव फुले यांची १३५वी पुण्यतिथी वर्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १००व्या वर्षानिमित्त हा उपक्रम होईल, अशी माहिती केशव शंखनाद पथकाचे संस्थापक अध्यक्ष नितीन महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी किशोर चव्हाण, रणजित हगवणे, नितीन महाजन, काळूराम डोमाळे, शैलेंद्र भालेराव, सुहास मदनाल आदी उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष रोहतास नाथ महाराज, डॉ. चेतनानंद महाराज पुणेकर, सोपान कानेरकर हे मार्गदर्शन करणार आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी आदी उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.