पुणे, ता. ३० : ‘‘प्रयोगशीलता, कल्पकता व चिकाटीच्या आधारावर तरुणांनी उद्योजकतेच्या नव्या वाटा निर्माण कराव्यात, तसेच भारतातील तरुणाईकडे अपार क्षमता असल्याचे,’’ प्रतिपादन नवी दिल्ली ‘एआयसीटीई’चे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे केले.
डीआयसीसीआय नेक्स्टजेन आणि नौरोसजी वाडिया कॉलेज यांच्या संयुक्त प्रयत्नातून आयोजित केलेल्या ‘ट्रेंडी टॉक्स हॅश टू एम्पॉवरिंग आंत्रप्रेन्युअरशिप थ्रू इनोव्हेशन’ या विशेष कार्यक्रमात डॉ. जेरे यांनी धोरणात्मक संधी, शासकीय साहाय्य, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, तसेच अपयशातून शिकण्याचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात विद्यार्थी, तरुण उद्योजक, संशोधक, उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधी, शैक्षणिक अधिकारी, तसेच लघुउद्योग क्षेत्राशी संबंधित सदस्य सहभागी झाले होते. या परिषदेमुळे उद्योजकतेसंबंधी विचारांची देवाणघेवाण, नवीन संकल्पनांची ओळख आणि भविष्यकालीन दिशांचा वेध घेण्याची संधी मिळाली.
डॉ. जेरे म्हणाले, ‘‘नवोपक्रमाशिवाय प्रगती शक्य नाही. गिग इकॉनॉमी, डिजिटल प्लॅटफॉर्म, फ्रीलान्सिंग व ऑन-डिमांड सेवांमुळे उद्योजकतेस नवीन दिशा मिळत असून, कमी भांडवलात व्यवसाय सुरू करण्याची संधी तरुणांना उपलब्ध होत आहे.’’
कार्यक्रमाचे अध्यक्ष डीआयसीसीआय संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, ‘‘एआय व नवतंत्रज्ञानामुळे शिक्षकविरहित शिक्षण पद्धती तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र गुरू-शिष्य परंपरा कधीही संपुष्टात येऊ शकत नाही. कारण शिक्षकांचा अनुभव आणि मार्गदर्शन हे गुगल किंवा एआयने दिलेल्या उत्तरांपेक्षा नेहमीच अधिक योग्य व परिणामकारक असणार आहे.’’
मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त प्रा. सचिन सानप यांनी शिक्षण आणि उद्योजकता यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केले. कार्यक्रमाचे समन्वयन संयोजक कुणाल जगताप यांनी केले. प्राचार्य डॉ. वसंत चाबुकस्वार यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.