पुणे, ता. ३ : ई-रजिस्ट्रेशनमुळे नोंदणीप्रक्रिया सोईस्कर झाली असून, गेल्या पाच वर्षांत या सुविधेच्या माध्यमातून एकूण ३१ हजार ७८५ दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी दिली.
नोंदणी व मुद्रांक विभागाच्या वतीने ई-रजिस्ट्रेशन आणि ई-एसबीटीआर प्रणालीबाबत आयोजित बैठकीत बिनवडे यांनी ही माहिती दिली. या वेळी नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय) उदयराज चव्हाण व विभागाचे इतर अधिकारी तसेच विविध बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बिनवडे म्हणाले, ‘‘नोंदणी व मुद्रांक विभागाने प्रथम विक्री करारनामा प्रक्रियेसाठी नागरिकांनी नोंदणी कार्यालयात न जाता ऑनलाइन पद्धतीने करण्याबाबत २०२०-२१पासून ही सुविधा सुरू केली. त्यासाठी नोंदणी अधिनियम आणि महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन नियमात आवश्यक ती तरतूद करण्यात आली. ई-एसबीटीआर हा मुद्रांक शुल्क भरण्याबाबतचा कायदेशीर व सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये डुप्लिकेशन व अन्य गैरप्रकारांना वाव राहणार नसल्याने त्याची विश्वासार्हता आहे. ई-एसबीटीआर या उपक्रमाची बारा वर्षांपासून अंमलबजावणी सुरू असून अद्यापपर्यंत यामध्ये गैरप्रकार झाल्याची कोणतीही बाब समोर आलेली नाही.’’
ई-एसबीटीआरवर मुद्रित केलेले, डिजिटली स्वाक्षरी असलेले व ई-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदणीकृत केलेले दस्त हे मूळ दस्त म्हणून ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे हे दस्त बँकांनी कर्जविषयक अथवा इतर कामकाजासाठी मूळ दस्त म्हणून ग्राह्य समजण्यात यावे, असे बिनवडे यांनी या वेळी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.