पुणे

नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार

CD

पुणे, ता. ३ : कुख्यात गुंड नीलेश घायवळने त्याच्या आडनावात ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ असा बदल करीत पोलिस आणि पासपोर्ट विभागाला चकवा देऊन तो स्वित्झर्लंडला पसार झाला. त्याने पासपोर्ट कार्यालयात त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे शपथपत्र दिल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गायवळ की घायवळ?
पुणे पोलिसांच्या पथकाने गुरुवारी नीलेश घायवळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील घरी छापा टाकून झडती घेतली. त्याने पासपोर्ट काढताना पुण्यातील कोथरूडऐवजी अहिल्यानगरमधील पत्ता दिला होता. अहिल्यानगर पोलिसांना त्याच्या पत्त्यावर कोणी आढळले नाही, तसेच, ‘सीसीटीएनएस’ (क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टिम्स) यंत्रणेत गायवळ नावाच्या व्यक्तीवर कोणताही गुन्हा दाखल नव्हता. त्यामुळे पोलिस पडताळणीच्या अर्जातील संबंधित रकान्यात ‘गुन्हा दाखल नाही’, असा शेरा लिहिला होता.

घायवळने तत्काळ पासपोर्टसाठी २३ डिसेंबर २०१९ रोजी अर्ज केला होता. त्याला दुसऱ्याच दिवशी म्हणजे २४ डिसेंबर रोजी पासपोर्ट देण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांना ज्या पत्त्यावर कोणी आढळले नव्हते. त्याच जामखेड येथील पत्त्यावर टपाल विभागाकडून पासपोर्ट पोच झाल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे.
---------------
आधार कार्डवरही ‘गायवळ’च
नीलेश घायवळच्या आधार कार्ड आणि इतर ओळखपत्रावरही ‘गायवळ’ असाच उल्लेख आहे. त्याने नावात बदल केल्याची काही कागदपत्रे पोलिसांना आढळून आली आहेत. त्याने न्यायालयात केलेल्या अर्जात घायवळ असा उल्लेख केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
--------------
पोलिस पडताळणीत गुन्हा नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने देशाचा नागरिक आणि आधार कार्डच्या आधारे त्याला पासपोर्ट दिला असावा. नीलेश घायवळने पासपोर्ट कार्यालयात त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे खोटे शपथपत्र दिले आहे. त्याआधारे पोलिसांकडून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात येणार असून, त्याची बॅंक खाती आणि बेकायदेशीर मालमत्ता गोठविण्यात येत आहे.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT