पुणे,ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा कार्यक्रमांतर्गत समर्थ युवा फाउंडेशन व नामदेव माळवदे मित्र परिवार यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २६ मध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ८५० हून अधिक नागरिकांची तपासणी झाली.
प्रभागातील घोरपडी पेठ येथील ननावरे चौक आणि रामकृष्ण मंडळ परिसर, स्वारगेट पोलिस वसाहत, खडकमाळ आळी येथील पांडव प्रताप मित्र मंडळ आणि रविवार पेठेतील श्री शिवांजली मंडळ अशा पाच ठिकाणी हे शिबिर झाले. यात दंत, मेमोग्राफी, नेत्र, रक्त आणि तोंडाच्या कर्करोगाची मोफत तपासणी केल्याचे नामदेव माळवदे यांनी सांगितली.