पुणे

पुण्यात पर्यटनासाठी विपुल वाव ः जितेंद्र डुडी

CD

पुणे, ता. १२ ः ‘‘महाराष्ट्र हे विविधता असलेले राज्य आहे. त्यामुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पर्यटनासाठी विपुल वाव आहे. त्यामुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर नेऊन येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे’’, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी दिली.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘सकाळ टुरिझम एक्स्पो’चे उद्‍घाटन डुडी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ‘केसरी टूर्स’च्या संचालिका झेलम चौबळ, ‘थॉमस कुक इंडिया लि.’चे महाराष्ट्र क्लस्टर हेड धीरज बारोट, गिरिकंद ट्रॅव्हल्सचे ‘हॉलिडे’ विभागप्रमुख विनायक वाकचौरे, ‘कॅप्टन नीलेश हॉलिडेज, पुणे’च्या संचालिका योगिता गायकवाड, ‘एसओटीसी हॉलिडेज’चे नॅशनल सेल्स हेड हिमांशू संपत, अलीअकबर जेतपुरवाला आदी उपस्थित होते.
डुडी म्हणाले, ‘‘पुण्यात धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, साहसी पर्यटन अशा सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत. तसेच, अलीकडे ‘मेडिकल टुरिझम’ हा नवा प्रकारही उदयाला आला आहे. त्यामुळे पर्यटनावर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी एक सर्वसमावेशक पर्यटनाचा आराखडा तयार करत आहोत. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना एकाच ठिकाणी सगळी माहिती मिळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.’’
देश-विदेशातील पर्यटन स्थळांची माहिती आणि सवलतीच्या दरात टूर पॅकेज देणाऱ्या टूर कंपन्यांचा सहभाग असलेला हा एक्स्पो रविवारपर्यंत (ता. १४) जंगली महाराज रस्त्यावरील हॉटेल सेंट्रल पार्क येथे खुला असेल. या एक्स्पोसाठी ‘केसरी टूर्स’ हे मुख्य प्रायोजक असून, ‘थॉमस कुक’ आणि गिरिकंद ट्रॅव्हल्स हे ‘पॉवर्ड बाय’ प्रायोजक आहेत. कॅप्टन नीलेश गायकवाड आणि एसओटीसी हॉलिडेज हे सहयोगी प्रायोजक आहेत.

‘सायकल स्पर्धेतून पुण्याची ओळख जागतिक स्तरावर’
‘‘पुण्यातील पर्यटनाच्या संधीची माहिती सर्व जगभरात पोहोचण्यासाठी जानेवारीमध्ये ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या जागतिक दर्जाच्या सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. या सायकल स्पर्धेच्या मार्गावर पुण्यातील सगळ्या महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘टूर दी फ्रान्स’ स्पर्धेतून ज्याप्रमाणे फ्रान्समधील पर्यटनाला चालना मिळाली, तसेच पुण्यातही नक्कीच होईल’’, असा विश्‍वास जितेंद्र डुडी यांनी व्यक्त केला.

हे लक्षात ठेवा
कधी : शनिवार आणि रविवार (ता. १३ आणि १४)
कुठे : हॉटेल सेंट्रल पार्क, जंगली महाराज रस्ता (छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकापासून चालत काही मिनिटांवरच)
वेळ : सकाळी १० ते रात्री ८
प्रवेश आणि पार्किंग मोफत. व्हॅले पार्किंगची सोय उपलब्ध.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९७६७१ ०१२५८

एक लाख देशभक्तांना अंदमान येथे नेण्याच्या संकल्पाला पर्यटकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे तो संकल्प पूर्ण झाला असून, आम्ही ‘आता लक्ष्य दशलक्ष’ या संकल्पाकडे वाटचाल करत आहोत. या प्रकल्पाला पर्यटकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आणि आमच्यावर दाखविलेल्या विश्‍वासामुळे आम्ही इतर अनेक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहली सुरू केल्या आहेत. पर्यटकांनी अवश्य आमच्या स्टॉलला भेट देऊन सर्व सहलींची सविस्तर माहिती घ्यावी आणि आपली सहल निश्‍चित करावी.
- कॅप्टन नीलेश गायकवाड, संस्थापक-संचालक, कॅप्टन नीलेश हॉलिडेज, पुणे

एसओटीसी हॉलिडेजतर्फे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय सहलींची खास पॅकेजेस कमी खर्चात व आकर्षक सवलतींसह उपलब्ध आहेत. क्रूज फ्री ऑफर, हॉलिडेवर हॉलिडे फ्री यांसारख्या संधींसह जपान, युरोप, अमेरिका, भूतानसह अनेक ठिकाणांच्या सहलींवर विशेष लाभ मिळू शकतो. पुणेकरांनी या ऑफर्सचा अधिकाधिक लाभ घ्यावा. सविस्तर माहिती एक्स्पोतील आमच्या स्टॉलवर उपलब्ध आहे.
- हिमांशू संपत, नॅशनल सेल्स हेड, एसओटीसी हॉलिडेज

ENG vs SA : नुसता धुरळा... Phil Salt चे वेगवान T20I शतक अन् जॉस बटलरच्या १५ चेंडूंत ७४ धावा; इंग्लंडचा रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर, मोडला भारताचा विश्वविक्रम

Elphinstone Bridge : मुंबईतील एलफिस्टन पुलावर अखेर हातोडा

Pune ZP : राज्यामध्ये ३४ ठिकाणी अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर; पुणे ‘झेडपी’साठी खुला प्रवर्ग, सतरा ठिकाणी महिलांसाठी आरक्षण

Karnataka accident during Ganesh Visarjan: कर्नाटकात भीषण दुर्घटना! गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; आठ जणांचा मृत्यू

Rafale fighter jets India: आता शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या 'राफेल' लढाऊ विमानांची भारतात निर्मिती होणार!

SCROLL FOR NEXT