पुणे

डिहायड्रेशन व्यवसाय प्रशिक्षण

CD

निर्जलीकरण व्यवसाय संधींविषयी मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण थेट निर्जलीकरण उद्योग प्रकल्पात १ व २ नोव्हेंबर रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात निर्जलीकरण म्हणजे काय, या तंत्रज्ञानाचे महत्त्व, उपयोग, व्यवसाय म्हणून तो कसा करावा, निर्जलीकरणासाठीचे प्रमुख घटक, वेगवेगळ्या पद्धती, निर्जलीकरणाद्वारे तयार होणारे घटक पदार्थ व त्याचे उपयोग, उत्पादन व बाजारातील किंमत, निर्जलीकरणासाठी लागणाऱ्या मशिनरी, त्याचा फ्लो चार्ट, उपलब्ध बाजारपेठ, विपणन पद्धती, शासकीय योजना व अनुदान, प्रकल्प उभारण्यासाठी जागेची निवड, अंदाजे गुंतवणूक, प्रकल्प अहवाल आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे. फळभाज्या, पालेभाज्या, कंद, पानवर्गीय वनस्पती, आयुर्वेदिक वनस्पती, फळे, दुग्धजन्य पदार्थ, मांस, मच्छी, चिकन या पदार्थांचे प्रात्यक्षिक होणार आहे.

प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीतून वाढवा आपला व्यवसाय
प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी हा एक विशेष प्रकार आहे. सध्या कॅमेऱ्यातूनही प्रॉडक्ट्सचे वेगळेपण फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून अधिक उठावदार पद्धतीने ग्राहकांपर्यंत पोहोचते. याबाबत मार्गदर्शन करणारे दोन दिवसांचे प्रशिक्षण १ व २ नोव्हेंबर रोजी आयोजिले आहे. यामध्ये प्रॉडक्ट फोटोग्राफी व व्हिडीओग्राफीचे प्रात्यक्षिकांसहित मार्गदर्शन होणार आहे. क्लासरूम प्रशिक्षण, प्रात्यक्षिक व एडिटिंग प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. या प्रशिक्षणाद्वारे आपल्याला या महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाबद्दल सखोल माहिती मिळेल. हे प्रशिक्षण नवीन लोकांसाठी तसेच इतर कोणत्याही व्यावसायिकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसायाला प्रोफेशनल लुक देण्यासाठी, ब्रँड अधिक ग्राहकांपर्यंत पोचवण्यासाठी, स्पर्धेत टिकण्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.

बना कुशल हायड्रोपोनिक तंत्रज्ञ
देशभरात अनेक व्यावसायिक हायड्रोपोनिक शेती करणारी युनिट स्थापन होत असून त्यांना यासाठी कुशल तंत्रज्ञांची गरज भासत आहे. हे लक्षात घेऊन असे कुशल तंत्रज्ञ तयार करण्याच्या उद्देशाने आठ दिवसांचा प्रगत प्रमाणपत्र अभ्यासक्रम ऑनलाइन व ऑफलाइन अशा संयुक्त स्वरूपात एक नोव्हेंबरपासून आयोजिला आहे. व्यावसायिकदृष्ट्या हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या तंत्राने जागेचा कार्यक्षम वापर करून गाजर, सलगम, मुळा, सिमला मिरची, वाटाणा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, टरबूज, अननस, सेलेरी, तुळस, टोमॅटो, भेंडी, औषधी वनस्पती, पालक, काकडी आदी पिकांची लागवड करता येते. अभ्यासक्रमात वनस्पती जीवशास्त्र, हायड्रोपोनिक प्रणाली, पाणी आणि पोषक तत्त्वांचे व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, शाश्वत शेती पद्धती, वनस्पतींची उत्तम वाढ आणि सुनिश्चित उत्पादन मिळण्यासाठी हायड्रोपोनिक तंत्राची रचना, स्थापना आणि देखभाल कशी करावी इ. विषयांवर अनुभवी तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन होणार आहे.

‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
---------------------------------------------------------------------------

‘महारेरा’ परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी
‘महारेरा’ सक्षमता प्रमाणपत्र सर्व स्थावर संपदा अभिकर्ते आणि बांधकाम क्षेत्रातील विकसकांकडे स्थावर संपदा व्यवहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनिवार्य झाले आहे. यासाठी ‘महारेरा’ मान्यताप्राप्त संस्थेमार्फत होणारे २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करणे व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचे पोर्टल १२ सप्टेंबर रोजी चालू झाले आहे. १० नोव्हेंबर रोजी हे पोर्टल बंद होणार असल्याने त्यापूर्वी एजंटचे प्रशिक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. पोर्टल बंद होण्यापूर्वीचे पुढील प्रशिक्षण तीन नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. २०२५ या वर्षात नंतर पोर्टल चालू होण्याची शक्यता नसल्याने प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबर २०२५मध्ये होणाऱ्या परीक्षेस सामोरे जाण्याची ही या वर्षातील शेवटची संधी आहे.
संपर्क : ८४८४८२२८५५, ८९५६३४४४७५, ७३५०००१६०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हर्षवर्धन पाटलांच्या कारखान्याला ११ कोटींचा दंड, राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांनीच मोडला नियम

Success Story: 19 व्या वर्षी साक्षी राहिंज इंडियन एअर फोर्समध्ये; पिंपरणेच्या लेकीची आकाशाला गवसणी, स्वप्न उतरवलं सत्यात!

Kolhapur 60 kg Silver Robbery : थरारक! आरामबसवर दरोडा, ६० किलो चांदी लुटली; कोल्हापुरातील घटना, बस थेट पोलिस ठाण्यात...

Land Acquisition : पुरंदर विमानतळासाठी नववर्षात भूसंपादन; जमीन परतावा, दर वाढवून देण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

BMC Election : देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेवर 'वंचित'ची नजर; '200 उमेदवार उतरवणार रिंगणात'; प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT