पुणे

भन्नाट

CD

१) आर्याबाग
माणूसपणाच्या विविध छटा या दिवाळी अंकातून मांडल्या आहेत. सुधीर पटवर्धन यांचे मुखपृष्ठ वेगळे आणि एक माणूस म्हणून विचार करायला लावणारे आहे. वसंत आबाजी डहाके, श्यामला वनारसे, गंधार पारखी, विजय जोशी, शेखर गायकवाड, गणेश मतकरी, अक्षय शिंपी, मेघना पेठे, चित्रा पालेकर, अतुल पेठे, चिन्मय केळकर, ओंकार जाधव आदी लेखकांनी ‘माणसाच्या गोष्टी’ या विभागात त्यांचे अनुभवविश्व आणि माणूसपणाच्या गोष्टी लिहिल्या आहेत. ‘चित्रसंवाद’ या विभागात मंगेश काळे, नीलेश खरे, दिनकर मनवर, वैभव मांगले, बी. जी. लिमये यांच्या चित्रांमधील प्रतिभा अनुभवायला मिळेल. कल्पना दुधाळ, केतन पुरी, मितेश घट्टे, शारदा बापट, अमित केवल, शीतल महाजन, विंदा महाजन, मिलिंद मोहिते, महेश भागवत, अनिल साबळे, प्रदीपकुमार माने यांसारख्या मान्यवरांनीही लेखन केले आहे.
संपादक : विश्वास कणेकर, पाने : २४०, किंमत : ४०० रुपये

२) रणांगण
या अंकात साहित्य, समाज आणि वास्तव या सर्व विषयांवर आधारित विविधांगी लेख, कथा, अनुभवकथन आहेत. अरविंद दोडे लिखित ‘जाणिवेचा आरसा’ हा किशोर कदम यांच्यावर लिहिलेला लेख वाचनीय आहे. त्याचबरोबर दीपक चैतन्य, श्रीधर नाईक, कामिल पारखे, स्वाती चांदोरकर, किरण येले, रोहन नामजोशी, प्रभाकर पवार आदी मान्यवरांचे लेखन वाचनीय आहे. ‘जीवन समृद्ध करणारी नृत्यकला’ हा सुमेधा गाडेकर यांचा लेख नृत्याविषयी वाचकांच्या मनात एक वेगळा भाव निर्माण करतो. ‘एकल पालकत्व’ निभावताना या लेखात सुनील पाटील अभ्यासपूर्ण भाष्य करतात. क्षमा शेलार यांची ‘यमूनी’ ही ग्रामीण भाषेतील कथा अंतर्मुख करते. राजेश दाभोळकर यांचा कोकणविषयक लेख हा वाचकांच्या मनात कोकणाबद्दल उत्सुकता वाढवतो. अंकाचे आकर्षक मुखपृष्ठ समीर दळवी यांनी केले असून, अंकातील व्यंगचित्रे विशाल सुरावकर यांनी प्रभावीपणे काढली आहेत.
संपादन : डॉ. अविनाश गारगोटे, पाने : १९२, किंमत : ३०० रुपये
------------
३) पाठलाग
हा दिवाळी अंक पोलिस तपासकथा विशेषांक आहे. यातील सर्व घटना सत्यघटनेवर आधारित आहेत. मुंबई, दिल्ली, कोलकता, कोचीन, मिर्झापूर, उज्जैन या शहरांमध्ये घडलेल्या गुन्ह्यांना पोलिसांनी कशाप्रकारे उजेडात आणले, या शोधामागील कहाण्या या अंकात आहेत.
कृ. जोशी, वि. रा. तळाशीलकर, डॉ. जान्हवी संत यादव, अशोक व्हटकर, वसंत खेडकर, सुहासिनी माडखोलकर, जयंत देवकुळे निरंजन घाटे, यशवंत बागवे आदींनी कथा लिहिल्या आहेत. बहुरुपी हेर ही कथा अ. सी. केळुस्कर यांनी लिहिली आहे. खुनी कमरपट्टा ही कथा प्रभाकर दिघे यांनी लिहिली आहे. विचित्र सूड कशापद्धतीने घेतला, याबाबत अशोक परांजपे यांनी मागोवा घेतला आहे.
संपादक ः आनंद साने, पाने ः २२८, किंमत ः ३०० रुपये
--------------------------
४) दिवेलागण
वैयक्तिक आयुष्यापासून ते अगदी सामाजिक विषयांचे जमाखर्च प्रकाशात आणणारा हा एक वेगळा दिवाळी अंक आहे. विचारांचा, अनुभवांचा, सत्याचा, आठवणींचा आणि कल्पकतेचा हा दिवाळी अंक असून, या अंकात प्रामुख्याने दोन विभाग आहेत. लेख या विभागात अरुण म्हात्रे, सॅबी परेरा, ज्ञानेश्वर बंडगर, अनंत फडके, बाबा आढाव, केदार मराठे, साहिल कबीर, हेमंत देसाई, सतीश तांबे, ऐश्वर्य पाटेकर, भालचंद्र सुपेकर, शंकर कणसे, विनोद नागपुरे, कलीम अजीम, प्रमोद बोरसरे यांसारख्या अनेक मान्यवर लेखकांनी आपले विचार आणि अनुभव मांडले आहेत. कविता या विभागात देविदास सौदागर, माधुरी मरकड, अनुजा जोशी, विनय पाटील, संजय चौधरी यांच्या कविता आहेत.
संपादक : प्राजक्ता ऐनापुरे-सणस, पाने : १३६, किंमत : २४९ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC Decision about World Cup: भारत विश्वविजेता झाल्याच्या पाच दिवसांतच ‘ICC’ने विश्वचषकाबाबत घेतला मोठा निर्णय!

India Pakistan Conflict: पाकिस्तान खरंच अणुचाचण्या करतंय का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मांडली भारताची भूमिका

MahaBiz Summit : राज्यातील उद्योजकांना मिळणार जागतिक संधींचे व्यासपीठ ‘जीएमबीएफ’ व ‘एमईडीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने दुबईत ‘महाबिझ’चे आयोजन

Mahar Vatan Land Scam : मुंढवा येथील जमीन गैरव्यवहारानंतर खळबळ; 'महार वतन जमिनी बळकावणाऱ्यांची सीबीआय चौकशी करा' महार वतन परिषदेची मागणी

Pune Traffic : सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर रिक्षा-कारचा तिहेरी अपघात! मोठी वाहतूक कोंडी, नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT