१) पर्ण
साहित्य, संस्कृती आणि वास्तव अशी टॅगलाईन पर्ण दिवाळी अंकाची आहे. यंदा बालपण, कुटुंब आणि आपली जडणघडण यावर आधारित विशेषांक आहे. ‘बालपणातून घडलो- ‘बि’घडलो या विभागात प्रा. प्रवीण दवणे, राजीव खांडेकर, सुनील बर्वे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, इंदुमती जोंधळे, एकनाथ आव्हाड, डॉ. गजानन देवधर आदींनी लिहिले आहे. ‘कुटुंब व्यवस्था ः समृद्ध समाजाची ताकद’ या विभागात उदय शेवडे, मानसी वैशंपायन, अशोक घोरपडे, गीता भावसार, वीणा सामंत आदींनी लिहिले आहे. वळणवाटा या विभागात अपर्णा नाडगौडी, कीर्ती जोशी, ऋतुजा फुलकर यांचे लेख आहेत. ज्ञानेश्वर जाधव, उत्कर्षा सुमीत, उमेश पटवर्धन, ॲड. संजन मोरे आदींच्या कथा आहेत. डॉ. शमा शेलार, राजा सावंत, इंद्रजित घुले, सुमेधा कुलकर्णी, नीलम माणगावे, कल्पना दुधाळ, निरुपमा महाजन, उत्तम कोळगावकर, विश्वास तांबोळी, प्रसन्न कुलकर्णी, भावना परब यांच्या कथा आहेत.
संपादक ः अपर्णा कुलकर्णी- नाडगौडी, पाने ः १६८, किंमत ः ३०० रुपये
-----------------------------------
२) झेप
कथा, कविता, वात्रटिका, हास्यचित्रे आदी भरगच्च मजकूर दिवाळी अंकात आहे. विजय कापडी, विजय महामिने, उत्तम सदाकाळ, सुनील देशपांडे, श्यामला जोशी, प्रा. भरत खैरकर, उर्मिला भावे, शशीदा इनामदार, लक्ष्मण कुऱ्हेकर, सुतेजा दांडेकर आदींच्या कथा आहेत. विनायक शिंदे, देवबा पाटील, रघुनाथ मोहिते, श्रीपाद कुलकर्णी आदींनी लहान मुलांसाठी लेखन केले आहे. चित्रा कुलकर्णी, रंजना वैद्य, सचिन बेंडभर, शंकर विटणकर आदींच्या कविता आहेत. ज्ञानेश बेलेकर, सुरेश राऊत, एस. ए. मुलानी, प्रभाकर दिघेवार, प्रभाकर झळके, जयवंत झळके आदींची व्यंगचित्रे आहेत. संजय घाटे, रामचंद्र पाचूनकर आदींच्या वात्रटिका आहेत.
संपादक ः बबन बांगडे, पाने ः १८० , किंमत ः १०० रुपये
-----------------------------
३) अपराध
‘गुन्हेगारी विश्वाची बित्तंबातमी’ अशी या दिवाळी अंकाची टॅगलाईन आहे. इंदिरा गांधी यांचा हुबेहुब आवाज काढून स्टेट बॅंकेतून ६० लाख रुपये लंपास करणाऱ्या रुस्तुम सोहराब नगरवाला या भामट्याची सत्यकथा आनंद साने यांनी लिहिली आहे. दिल्लीच्या नॅशनल म्युझियमवर पडलेल्या धाडसी दरोड्यावर लक्ष्मीदास बोरकर यांनी प्रकाश टाकलेला आहे. श्रीकांत सिनकर यांनी एका ठकसेनाची ओळख करून दिली आहे. करमचंदच्या करामती जयंत रानडे यांनी सांगितल्या आहेत. एका उलटलेल्या डावावर बा. सी. अष्टेकर यांनी लिहिले आहे. घसरलेल्या पावलामुळे नशिबी आलेल्या भोगाविषयी श्रीनिवास शिरधनकर यांनी व्यथा मांडली आहे. हिऱ्याची हेराफेरी यावर सतीश शहा यांनी लिहिले आहे.
संपादक ः जयश्री अभ्यंकर जोशी, पाने ः २४४, किंमत ः ३०० रुपये
---------------------------------------------------
४) क्रीडा साधना
क्रीडा विषयाला वाहिलेला हा अंक आहे. क्रीडा संस्कृती रूजवण्याबाबत अनुजा दाभाडे यांचा लेख आहे. बुद्धिबळाचे भीष्माचार्य भाऊसाहेब पडसलगीकर यांच्या कार्याची ओळख जयंत गोखले यांनी करून दिली आहे. दिव्या देशमुखच्या दिग्विजयाबाबत रघुनंदन गोखले यांनी भाष्य केले आहे.
दिव्यांग नेमबाज अवनी लेखरा हिच्या कार्याचा मिलिंद ढमढेरे यांनी वेध घेतला आहे. गिर्यारोहण या साहसी प्रकाराविषयी उमेश झिरपे यांनी लिहिले आहे. भारतीय क्रिकेटचे तारणहार असलेले लाला अमरनाथ व त्यांची दोन्ही मुले सुरिंदर अमरनाथ व मोहिंदर अमरनाथ यांच्या कार्याची ओळख श्रीपाद पेंडसे यांनी करून दिली आहे. महिला क्रिकेटच्या उत्तुंग भरारीवर अमित डोंगरे यांनी प्रकाशझोत टाकला आहे. क्रीडा महर्षी हरिभाऊ साने यांच्यावर गिरीश पोटफोडे यांनी लिहिले आहे.
संपादक ः सतीश सिन्नरकर, पाने ः १७८, किंमत ः २०० रुपये
५)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.