स्वागत दिवाळी अंकाचे
---------------------------
१)अंतरीचे प्रतिबिंब
यंदाचा अंक हा कथा विशेषांक आहे. त्यामुळे मान्यवरांच्या कथांबरोबरच विविध कथाप्रवाहांचे अंतरंगही अंकात उमटले आहेत. त्याचबरोबर कथालेखनाची सूत्रे देऊन नवोदित लेखकांना मार्गदर्शन केले आहे.
फडके खांडेकर युगावर गीतांजली जोशी यांनी प्रकाशझोत टाकला आहे. विज्ञानकथांची दमदार वाटचाल राजू इनामदार यांनी उलगडून दाखवली आहे. स्री कथाकारांचे विविध पैलू प्रज्ञा जांभेकर यांनी मांडले आहेत. विविध कथाप्रवाहावर अनिकेत जोशी यांनी लिहिले आहे. त्याचबरोबर देविदास सौदागर, मिलिंद बोकील, डॉ. अविनाश कोल्हे, निरंजन घाटे, स्मिता पोतनीस, सुनील कांबळे, सुवर्णा बेडेकर, शशिकांत काळे, अशोक बागवे, मुकेश माचकर, अनिरुद्ध जोशी, भाग्यश्री नूलकर, दीपाली दातार, शैलेंद्र शिर्के आदींचे लेख व कथांनी अंकाची उंची वाढवली आहे. प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्रे आहेत.
संपादक ः प्रज्ञा जांभेकर, पाने ः ३८२, किंमत ः ४०० रुपये
--------------------------------------------
२) भन्नाट
विनोदाला वाहिलेला हा दिवाळी अंक आहे. यामध्ये गाढवाला कळाली गुळाची चव - बबन मोरे, नाट्यछटा प्रकारात उसनी बुद्धिमत्ता - डॉ. श्रीकांत नाडगौडा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला- अमोल अंकुलकर, उचलबांगडी- श्रीकांत कुलकर्णी, द. मा. मिरासदार येता घरा- मनोहर कुलकर्णी, मी स्वयंपाक करतो - भारती सावंत, धक्क्यावर धक्के- प्रेमा खांडवे, मॉर्निंग वॉक - स्नेहलता ढवळीकर, बाप माणूस - सुरेश पोरे, गावाकडची दिवाळी- सुधा भिम्बार-पाटील, सत्काराची ऐशी-तैशी- दादासाहेब सादोळकर, माझी ‘दंतकथा’- श्रीपाद टेंबे, संवाद....किचनमधील भांड्यांचा - रत्नाकर वाणी, पिन आणि मी - अच्युत मेढेकर आदींच्या कथा व लेख यांचा समावेश आहे. जाहिरातवेडी पत्नी हा अनुवादित लेखही या अंकात आहे.
संपादक : श्रीराम ढवळीकर, पाने : १३०, किंमत : १५० रुपये
-----------
३) समिधा
कथा, लेख, विनोदी कथा, अध्यात्म, वार्षिक राशिभविष्य, व्यंगचित्रे, वात्रटिका अशा मजकुराने हा दिवाळी अंक सजला आहे. शिवाय अंकात गझल, कविता आणि चारोळ्यांचाही समावेश आहे. स्वयंसिद्धा - चंद्रलेखा जगताप, असा हा पाऊस - चंद्रशेखर पटवर्धन, मज वाटल्यावरी भीती - सायली कुलकर्णी, कविता कशासाठी - तुळशीराम बोबडे, चमाचम - शिवाजी शिंदे, भाऊबंदकी - सरिता देशमुख, वास्तव - डॉ. प्रशांत यवतकर, सवय - लक्ष्मीकांत दाभाडकर यांच्या साहित्याचा यात समावेश आहे. यासोबतच रश्मी गुजराथी- एकटेपणा, अनिरुद्ध जोशी यांचा सिंधी श्रीमंत कसे झाले या लेखाचाही समावेश आहे. आई या विषयावर माधुरी वैद्य, डिसोझा कुमठेकर यांनी मांडणी केली आहे. माऊलींची वारी आणि अपेक्षा या विषयावर व्यंकटेश जोशी यांनी लेख लिहिला आहे.
संपादक : शैलजा सिंहासने, पाने : २५०, किंमत : ३०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.