पुणे

अतिक्रमण विभागाला हवेत आणखी ८० कर्मचारी

CD

पुणे, ता. ६ : शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर आणि महापालिकेच्या जागांवर वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून जुजबी कारवाई केली जाते. ‘अतिक्रमण काढून घ्या’, असे निरोप कारवाईपूर्वी पाठवले जातात. अशी स्थिती असताना अतिक्रमण विभागाने अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण देत आणखी ८० कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे.
शहरातील मुख्य ४५ रस्त्यांवर पथारी व्यावसायिकांना बंदी असतानाही बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. महापालिकेने २०१७ मध्ये २१ हजार पथारी व्यावसायिकांना परवाने देऊन त्यांना निश्‍चित जागा दिल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत जवळपास प्रत्येक रस्त्यावर परवानाधारक नसलेले व्यावसायिक ताबा मिळवत आहेत. अतिक्रमण विभागाकडे कारवाईची जबाबदारी असली तरी प्रत्यक्षात ती जबाबदारी १५ क्षेत्रीय कार्यालयांवर सोपविली आहे. मात्र, काही स्थानिक अतिक्रमण पथके कारवाईऐवजी या व्यावसायिकांना ‘अभय’ देत आहेत. त्यामुळे दर तीन महिन्यांनी अतिक्रमण निरीक्षकांची बदली करण्याचा धोरणात्मक निर्णय झालेला आहे. पण त्याची अंमलबजावणी होऊ दिली जात नाही. त्यामुळेच गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, लक्ष्मी रस्ता, स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजी महाराज रस्ता, वाकडेवाडी बसस्थानक परिसरात अतिक्रमणे वाढत आहेत.
अतिक्रमण कारवाईचा जोर वाढविण्यासाठी गेल्या वर्षी ३२० बिगारी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. तरीदेखील अतिक्रमणांवर नियंत्रण आले नाही. आता आणखी ८० बिगारी वाढवून देण्याचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.

८१ सहाय्यक निरीक्षक कार्यरत
अतिक्रमण विभागात मुख्य निरीक्षकांच्या १५ जागा असून, त्यांच्या मदतीसाठी १७४ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांची पदे मंजूर आहेत. दोन वर्षांपूर्वी १०० जागा भरल्या होत्या. त्यातील १९ जणांनी नोकरी सोडल्याने सध्या ८१ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : "नेत्याच्या निधनाबाबत सत्य समोर यावे; शांत राहणे नैतिकतेला शोभणारे नाही..." : आमदार अमोल मिटकरी

Mokhada News : मोखाड्यातील बालकांनी अनुभवले मंत्रालय, मंत्र्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा; परिवर्तन संस्थेचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

SCROLL FOR NEXT