आहारामध्ये आवळ्याचे खूप महत्त्व आहे. शरीरासाठी अत्यंत बहुगुणी असणारा आवळा विविध रोगांवर रामबाण उपाय तसेच रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे जीवनसत्त्व ‘क’युक्त असतो. अत्यंत गुणकारी अशा आवळ्याच्या विविध प्रकार व त्याचे व्यावसायिक रूपांतर याबाबतची कार्यशाळा ९ नोव्हेंबर रोजी आयोजिली आहे. आवळा व्यवसायामध्ये बाजारपेठेची मोठी मागणी आहे. यामध्ये नावीन्यपूर्ण व्यवसाय करण्याची संधी आहे. तसेच आवळा प्रक्रिया उद्योगालाही बाजारपेठेमध्ये मोठी मागणी आहे, या अनुषंगाने ही कार्यशाळा आयोजिली आहे. कार्यशाळेत कॅण्डी, मधातील कॅण्डी, मसाला कॅण्डी, पेरी पेरी कॅण्डी, शुद्ध रस, पाचक, सरबत, आवळा युक्त गुलकंद, च्यवनप्राश, जॅम, सुपारी, गोड लोणचे, तिखट लोणचे इत्यादी मूल्यवर्धित प्रकार शिकवले जाणार आहेत. यासह आवळा प्रक्रिया उद्योग कसा सुरू करावा, आवळा टिकवण्याच्या पद्धती, लागणारी पायाभूत मशिनरी, एकूण गुंतवणूक, विक्री व्यवस्थापन आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
सरकारी इस्टिमेशन प्रशिक्षण
शासकीय कामांचे मूल्यनिर्धारण, इस्टिमेशन हे बांधकाम, स्थापत्य विभागातील, कंत्राटदार, विद्यार्थी तसेच अभियंता, पर्यवेक्षक व शासकीय अधिकारी यांना उपयुक्त असे ऑनलाइन प्रशिक्षण १० नोव्हेंबर रोजी आयोजिले आहे. प्रशिक्षणात सार्वजनिक बांधकाम विभाग, एसएसआर, रेट, नियमावली, टेस्टिंग, व्यवस्थापन पत्रक, रेट तपासणी, चार्ट, इस्टिमेशन सॉफ्टवेअर व इस्टिमेशन बनविणे, तयार करणे, समाज मंदिर, सभा मंडप, शाळा, अंगणवाडी, सुरक्षा भिंत अशा प्रकारचे कामे व इस्टिमेशन आदींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येईल. या प्रशिक्षणामुळे सहभागींना प्रत्यक्ष कामकाजातील कौशल्य, खर्च नियंत्रण आणि तांत्रिक ज्ञान अधिक प्रभावीरीत्या आत्मसात करण्यास मदत होईल.
सरकारी बाजारपेठ (जीईएम पोर्टल) प्रशिक्षण
सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था खरेदी करत आलेल्या विविध वस्तु आणि सेवांच्या खरेदीसाठी एक ई बाजारपेठ म्हणजेच डिजिटल ई-कॉमर्स पोर्टल आहे, ते म्हणजेच जीईएम पोर्टल. या पोर्टल वर सरकारी संस्था/विभाग/सार्वजनिक संस्था यांना लागणाऱ्या वस्तू, एखादा इच्छुक व्यक्ती त्याच्या व्यवसायाची नोंदणी करून त्याच्या सेवा व वस्तू यांची थेट विक्री करू शकतो. हे प्लॅटफॉर्म केंद्र व राज्य सरकारातील मंत्रालये/विभाग, केंद्र व राज्याचे सार्वजनिक उपक्रम, स्वायत्त संस्था आणि स्थानिक संस्थांना सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने खरेदी करण्यासाठी आरंभापासून अखेरपर्यंत ऑनलाइन मार्केटप्लेस उपलब्ध करून देते. याबाबतच मार्गदर्शन करणारे ऑनलाइन दोन आठवडे चालणारे प्रशिक्षण १० नोव्हेंबरपासून आयोजिले आहे. व्यवसाय वाढीसाठी हे उपयुक्त प्रशिक्षण आहे.
आयात-निर्यात व्यवसाय प्रशिक्षण
आजच्या स्पर्धात्मक आणि जागतिकीकरणाच्या युगात व्यापाराला सीमारेषा राहिलेल्या नाहीत. भारतीय उत्पादने जगभरात पोचू शकतात, फक्त योग्य मार्गदर्शन, नियोजन आणि धोरणे असणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर १५ नोव्हेंबरपासून सहा दिवसांचे ‘आयात-निर्यात व्यवसाय संधी व व्यवस्थापन’ हे प्रशिक्षण आयोजिले आहे. प्रशिक्षणात EXIM धोरण, IncoTerms, शिपिंग आणि कंटेनर व्यवस्थापन, दररचना व आंतरराष्ट्रीय मालवाहतूक, तसेच पॅकेजिंग, लेबलिंग, डिजिटल टूल्स आणि सरकारी योजना यावर अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. वाटाघाटी करण्याच्या कौशल्यापासून ते आवश्यक कागदपत्रांची पूर्तता कशी करावी या सर्व बाबींचा प्रशिक्षणात समावेश असणार आहे. स्टार्टअप्स, लघुउद्योजक, व्यापारी आणि नवउद्योजक यांच्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल.
‘एसआयआयएलसी’च्या विविध प्रशिक्षण व कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२
क्यूआर कोड :