पुणे, ता. ८ : विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे १० दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण सोमवार (ता. १०) पासून सुरु होत आहे. यात विविध विभागातील नोंदणी, निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटली सही, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
इन्स्टंट मसाले व प्रीमिक्स कार्यशाळा
सध्याच्या धावपळीच्या युगात इन्स्टंट फूडला बाजारपेठेमध्ये खूप मागणी आहे. हे लक्षात घेऊन इन्स्टंट मसाले, प्रीमिक्स व चटणी तयार करण्यास शिकवणारी दोन दिवसीय प्रात्यक्षिकावर आधारित कार्यशाळा शनिवार (ता. १५) पासून आयोजिली आहे. रेडी टू कूक मसाले आणि ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पनीर मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, मिसळ मसाला, महाराष्ट्रीयन ग्रेव्ही, हैदराबादी ग्रेव्ही, व्हाइट ग्रेव्ही, मालवणी ग्रेव्ही, फिश फ्राय मसाला, चायनीज ग्रेव्ही, जैन स्पेशल ग्रेव्ही, चायनीज ग्रेव्ही हे पदार्थ शिकवले जातील. इन्स्टंट रेडी टू कुक मसाले व नावीन्यपूर्ण ग्रेव्ही यामध्ये इन्स्टंट पीठे व प्रिमिक्स शिकवले जातील ज्यामध्ये डोसा, इडली, गुलाब जामुन, आइस्क्रीम, ढोकळा, रबडी, शाही खीर, मसालेभात दाल खिचडी, थालीपीठ, चकली भाजणी हे पदार्थ शिकवले जातील.
एआय मास्टरक्लास प्रशिक्षण
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व्यावसायिक प्रगती साधू इच्छिणाऱ्या प्रोफेशनल्स आणि उद्योजकांसाठी ‘एआय मास्टरक्लास’ हे विशेष ऑनलाइन प्रशिक्षण १६ नोव्हेंबरपासून आयोजिले आहे. यामध्ये चॅटजीपीटी आणि इतर कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करून आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त माहिती, कल्पना आणि रणनीती कशा तयार करायच्या तसेच आकर्षक बिझनेस प्रेझेंटेशन, मार्केटिंग मटेरिअल (जाहिराती, कॅम्पेन कंटेंट), सोशल मीडियासाठी पोस्ट्स, अहवालाचे कौशल्य, बिझनेस मॉडेल्सच्या पद्धती आदी बाबींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. रिअल-लाइफ केस स्टडीज आणि लाइव्ह अॅक्टिव्हिटीजद्वारे प्रत्यक्ष अनुभवाला यामध्ये प्राधान्य देण्यात येईल. प्रशिक्षणातून सहभागींची उत्पादकता वाढेल, कमी वेळेत अधिक काम पूर्ण करता येईल आणि व्यवसायातील मार्केटिंग, सेल्स व ग्राहक सेवेमध्ये वेगाने प्रगती साधता येईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून स्पर्धेत पुढे जाण्याची ही संधी उपयुक्त आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२