पुणे, ता. ८ ः देशातील अग्रगण्य वाहन विक्रेते ‘ऑटोबान ट्रकिंग’ यांना जर्मनीतील कार्ल्सरुहे येथे नुकत्याच झालेल्या ‘डायम्लर ग्लोबल डीलर परिषदेत’ ‘डीलर ऑफ द इयर’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. यासह ऑटोबान ट्रकिंगला आणखी आठ श्रेणीतील पुरस्कारही मिळाले आहेत.
विक्रीतील उल्लेखनीय कामगिरी, उत्कृष्टता ग्राहक सेवा, विक्रीपश्चात साहाय्य, यासह देशातील भारतबेंझ ब्रँडच्या प्रगतीसाठी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार ऑटोबान ट्रकिंगचे अध्यक्ष एम. ए. एम. बाबू मूपन यांना डायम्लर इंडिया कमर्शिअल व्हेईकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यकाम आर्य यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ऑटोबान ट्रकिंगचे व्यवस्थापकीय संचालक फरझाद कुलाथ यासह जगभरातील मर्सिडीज-बेंझ आणि भारतबेंझ विक्रेते उपस्थित होते. बाबू मपन म्हणाले, ‘‘डायम्लरच्या जागतिक मंचावर मिळालेला हा पुरस्कार आमच्यासाठी एक अभिमानास्पद क्षण आहे. हा सन्मान आमच्या समर्पणाचा, ग्राहकांच्या विश्वासाचा आणि डायम्लर इंडिया कमर्शिअल व्हेईकल्ससोबतच्या मजबूत भागीदारीचे प्रतीक आहे.’’
कुलाथ म्हणाले, ‘‘जर्मनीतील डायम्लरच्या मुख्यालयात हा सन्मान मिळणे आमच्यासाठी अत्यंत गौरवाचा क्षण आहे. या पुरस्काराने आम्हाला भारतबेंझच्या अनुभवाला सर्वोत्तम पातळीवर नेण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा दिली आहे.’’
-----------------
फोटोः 66347
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.