पुणे

सीमा आनंद यांना ऐकण्याची पुणेकरांना संधी

CD

पुणे, ता. १८ ः दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपल्या खुमासदार शैलीत भाष्य करणाऱ्या लोकप्रिय वक्त्या, लेखिका आणि ‘स्टोरीटेलर’ सीमा आनंद यांचे व्याख्यान ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
निमित्त आहे, ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाचे. संतुलित आणि निरामय आरोग्याचा जागर करणाऱ्या या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून, भारती विद्यापीठ सहयोगी प्रायोजक आहेत. या महोत्सवांतर्गत ७ डिसेंबरला हॉटेल कॉनरॉड येथे होणाऱ्या विशेष व्याख्यान सत्रांमध्ये सीमा आनंद यांचे व्याख्यान होणार आहे. या सत्राला विनामूल्य प्रवेश आहे, मात्र नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी बातमीसोबत दिलेला ‘क्यूआर कोड’ स्कॅन करावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.
प्राचीन भारतातील ‘कर्म महोत्सव’ आणि सण-संस्कृतीशी संबंधित विविध विषयांवर त्यांचा अभ्यास असून, आजच्या पिढीला त्या काळाशी जोडण्याची हातोटी त्यांच्या वक्तृत्वामध्ये आहे. आपली मूळ संस्कृतीचे संरक्षण-संवर्धन व्हावे, हवामान बदलासारख्या घटकांचा त्या दृष्टीने विचार व्हावा आणि जीवसृष्टीचा आधार असलेल्या वसुंधरेची समृद्धता अबाधित राहावी, यासाठी सीमा आनंद प्रयत्नरत आहेत. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करायला हवे, याबाबत माहिती देताना त्या पुराणे आणि प्राचीन साहित्यातील समर्पक दाखलेही देतात. लुप्त होत जाणाऱ्या प्रथा-परंपरा जपणं गरजेचे असून, त्याद्वारे काय साध्य होऊ शकते, हेदेखील त्या मांडतात. जगण्यातली संवेदनशीलता जपत शरीर व मनाचे सबलीकरण करून, निसर्गाशी जोडलेली नाळ टिकवून ठेवण्यासाठी काय करता येईल? याची मांडणी त्या ओघवत्या शैलीत करतात. पुणेकरांना त्यांच्या व्याख्यानातून वैचारिक खाद्य मिळेलच, पण सुखी व आनंदी जगण्याच्या ‘टिप्स’ मिळतील आणि त्यांचे ‘स्वास्‍थ्यम्’ अधिक आरोग्यदायी होईल.

खुमासदार शैलीतील समर्पक उदाहरणे
सीमा आनंद यांचा महाभारत, तत्त्वज्ञान आणि पुराणांचा सखोल अभ्यास असून, भारतातील मौखिक ज्ञानपरंपरेचे पुनरुज्जीवन व्हावे, या उद्देशाने त्या कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची ‘युनेस्को’ने दखल घेतली आहे. फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या सीमा आनंद मनःशांती, यशापयश, जीवन, ध्यानधारणा, भगवद्‍गीता, रागसंगीत अशा विविध विषयांवरील आपले विचार व्हिडिओद्वारे मांडत असतात. इंटरनेटवरील ‘फॉलोअर्स’च्या प्रश्‍नांना त्या हटके शैलीत चपखल उत्तरेही देतात. ‘द आर्ट ऑफ सिडक्शन’ आणि ‘स्पीक ईझी’ ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT