पुणे

ठेकेदाराच्या मनमानीमुळे रस्त्यांची दुरवस्था - रस्ते खोदाईसाठीच्या नियमावलीकडे दुर्लक्ष - वारंवार सूचना देऊनही कामात सुधारणा नाही

CD

पुणे, ता. १७ : शहरात सीसीटीव्हींसाठी रस्ते खोदाई करताना नियमावली तयार केली आहे. यावर महापालिकेचे अभियंते नियंत्रण ठेवणार आहेत. मात्र, काही दिवसांपासून शहरात सीसीटीव्हींसाठी खोदाई करताना ठेकेदाराने नियमावलीकडे दुर्लक्ष करत वाटेल तेथे केबल टाकण्यासाठी खड्डे खोदले आहेत. पण ते वेळेत न बुजविल्याने मध्यवर्ती भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाने पुणे, पिंपरी-चिंचवड व पुणे जिल्ह्यात सीसीटीव्हीचा मोठा प्रकल्प जाहीर केला आहे. सीसीटीव्हीचे जाळे तयार करण्यासाठी जिल्ह्यात १६०० किलोमीटर लांबीचे रस्ते खोदावे लागणार आहेत. त्यापैकी ५५० किलोमीटर लांबीची खोदाई पुणे शहरात होणार आहे. दिवाळीपूर्वी रस्ते खोदाई सुरू करण्यात आली. मध्यवर्ती भागासह उपनगरांतील रस्ते आणि पदपथ खोदल्याने ठिकठिकाणी रस्त्‍यावर खडी पसरली होती. खड्डे वेळीच न बुजविल्याने रस्ते धोकादायक झाले होते. त्यामुळे नागरिकांनी या कामावर टीकेची झोड उठवली होती. ऐन दिवाळीत या खोदाईमुळे वाहतूक कोंडी झाल्याने या कामाला दिवाळी होईपर्यंत स्थगिती दिली होती.

ठेकेदाराची कानउघाडणी;
मात्र कामात सुधारणा नाही
सीसीटीव्हीसाठी खोदाई करणाऱ्या ठेकेदाराला शुल्क माफ केले आहे. रस्ते दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात आली आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यात ७२ किलोमीटर लांबीचे रस्ते खोदण्याची परवानगी दिली. त्यानंतर ठेकेदाराने महापालिकेशी समन्वय न ठेवता एकाच वेळी अनेक रस्त्यांवर खोदाई सुरू केली. या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ठेकेदाराची कानउघाडणी करून व्यवस्थित काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतरही ठेकेदारच्या कामात सुधारणा झालेली नाही.

पथ विभागाचे दुर्लक्ष
१) ठेकेदार व्यवस्थित काम करत नसेल तर महापालिकेने पोलिसांकडे तक्रार करून, तसेच अभियंत्यांना लक्ष ठेवायला सांगून कामे करून घेणे आवश्‍यक आहे.
२) अभियंत्यांनी आखणी करून दिल्यानंतरच ठेकेदाराने रस्ते खोदाई करावी, असे ठरले आहे. मात्र पथ विभागाने कुठेही आखणी करून दिलेली दिसत नाही. सगळ्या उपाययोजना कागदावरच आहेत.
३) रस्त्यांची दुरुस्ती महापालिकेने करायची आहे. पण पथ विभाग या कामाकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे ठेकेदाराचा मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसत आहे.


पूर्व भागात जोरदार खोदाई
शहराच्या पूर्व भागात म्हणजे शिवाजी महाराज रस्ता, सेव्हन लव्हज चौक, रविवार पेठेसह अन्य भागांत मोठ्या प्रमाणात खोदाई सुरू आहे. रविवार पेठेसारख्या गर्दीच्‍या बाजारपेठेत रस्ते खोदून ठेवून तीन-चार दिवस झाले तरीही तेथे दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे टिळक चौकात पाच दिवसांपासून पादचारी मार्ग खोदून ठेवला आहे. तेथे केबल्सही टाकल्या आहेत. मात्र त्याकडेही पथ विभागाने दुर्लक्ष केले आहे.

खडीमिश्रित माल जातो कुठे?
महापालिकेच्या येरवड्यातील हॉटमिक्स प्लांटवरून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला १० टन व मुख्य खात्याकडे जवळपास ३०० टन खडीमिश्रित डांबर मिळतो. त्याद्वारे रस्ते दुरुस्ती, खड्डे बुजविण्याची कामे केली जातात. पण शहराच्या मध्यवर्ती भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात खोदाई करूनही रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. त्यामुळे हा शेकडो टन माल जातो कुठे, असा प्रश्‍न नागरिक उपस्थित करीत आहेत.

रस्ते खोदाई करताना ठेकेदाराने पथ विभागाशी समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर हे काम होत नसेल तर पथ विभागाला सूचना दिल्या जातील. तसेच ठेकेदाराची पोलिसांकडे तक्रार केली जाईल. ठेकेदाराला सध्या एकाच टप्प्याची परवानगी दिली आहे. पुढील टप्प्याची परवानगी दिलेली
नाही. खोदकाम झालेल्या ठिकाणी त्वरित दुरुस्तीचे आदेश दिले जातील.
- ओमप्रकाश दिवटे,
अतिरिक्त आयुक्त, महापालिका

रस्ते खोदाई करताना ठेकेदार आणि महापालिकेत समन्वय गरजेचा आहे. जर ठेकेदार महापालिकेचेच ऐकत नसेल तर त्याचे आणि प्रशासनाचे संगनमत आहे, असे समजायचे का? खड्डे वेळीच न बुजविल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालक त्यामध्ये पडून जखमी होत आहेत. याकडे महापालिका दुर्लक्ष का करत आहे?
- परेश खांडके, नागरिक

तुमचे मत मांडा...
खोदाई करताना ठेकेदाराने नियमावलीकडे दुर्लक्ष केले आहे. केबल टाकण्यासाठी वाटेल तेथे खड्डे खोदले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत आपले मत मांडा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT