पुणे

एका कला पर्वाची पंचविशी!

CD

अश्वमेध कला पर्व आपली पंचविशी साजरी करत आहे. या निमित्ताने सादर होणारा विशेष कार्यक्रम बुधवार, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी अश्वमेध सभागृह, कर्वे रस्ता, पुणे येथे सायंकाळी साडेपाच वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमात मराठी साहित्य आणि दूरदर्शन इतिहासातील दोन अमूल्य दृश्यफिती दाखवल्या जाणार आहेत. त्यानिमित्त...
- अरुण काकतकर

‘दीनायन कला पर्व’ची बीजे भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रेरणेतून रोवली गेली. संगीत आणि साहित्य या दोन प्रवाहांना एकत्र आणणारा हा उपक्रम काळाच्या प्रवाहात एक सशक्त सांस्कृतिक चळवळ बनला. दूरदर्शनमध्ये दीर्घकाळ निर्माता म्हणून काम करताना मला अनेक कलाकारांच्या कार्यक्रमांचे ध्वनिचित्र संचयित करण्याची संधी मिळाली. आज त्या दृश्यफिती म्हणजे इतिहासाची जपलेली पावती आहेत. या जपलेल्या स्मृती नव्या पिढीला दाखवाव्यात, आणि ज्येष्ठांना पुन्हा त्या सुवर्णकाळाचा अनुभव द्यावा, हीच या प्रयत्नामागची प्रेरणा आहे.
या पंचवीस वर्षांच्या प्रवासानंतर आता ‘अश्वमेध कला पर्व’ या ‘दीनायन कला पर्व’च्या आशीर्वाद आणि उत्तरदायित्व माथ्यावर घेत पुढील, तितक्याच सुदृढ, सकस अंकानं अनेक अविस्मरणीय कार्यक्रम सादर केले. पहिला कार्यक्रम होता कविवर्य ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित! या कार्यक्रमासाठी साक्षात पं. हृदयनाथ मंगेशकर उपस्थित होते. त्या सायंकाळी ग्रेस यांच्या कवितेतील गूढता, व्याकुळता आणि नादमाधुर्य एकत्र मिसळून एक विलक्षण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतरच्या पर्वात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्यावर आधारित कार्यक्रमाने तर रसिकांच्या डोळ्यांत पाणी आणले. बा. भ. बोरकरांच्या काव्यरचना आणि गदिमांच्या ‘शब्दानन’ या काव्यकृतींवरचे कार्यक्रम हेही पर्वाचे सुवर्ण अध्याय ठरले.
१९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात मराठी साहित्य आणि दूरदर्शन इतिहासातील दोन अमूल्य दृश्यफिती दाखवल्या जाणार आहेत.
‘छावा’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाने नुकताच संपूर्ण देशभर डंका वाजवलेला आहे. ‘मृत्युंजय’ आणि ‘युगंधर’ या त्यांच्या कादंबऱ्यांनी मराठी वाचकांना एक नवे तत्त्वचिंतन दिले. अशा या विचारवंत लेखकाची मुलाखत सिंहगडच्या कल्याण दरवाजावर माझ्या उपस्थितीत रवींद्र भट आणि विजय केसकर यांनी घेतली होती. ही दृश्यफिती म्हणजे एका विचारवंत लेखकाला ऐकण्याचा आणि अनुभवण्याचा दुर्मीळ संधी या कार्यक्रमात मिळणार आहे.
‘चैत्रबन’... १९८३ मध्ये दूरदर्शनवर सादर झालेला हा कार्यक्रम म्हणजे ग. दि. माडगूळकरांच्या काव्यसृष्टीचा सांगीतिक प्रवास! ‘चैत्रबन’चा अवधी सुमारे एक तासाचा आहे आणि त्यातील निवेदन सुप्रसिद्ध सुधीर गाडगीळ यांनी केले होते. त्याचाही आनंद पुन्हा घेता येणार आहे.
थोडक्यात, दूरदर्शनच्या सुवर्णकाळाने आम्हाला काय दिलं, हे या पर्वातून प्रत्येकाला पुन्हा जाणवेल. त्या काळात माध्यमं कमी होती, पण आशय अधिक होता. शब्दांत, सुरांत आणि भावनेत असलेली ताकद आजही तितकीच प्रभावी आहे. त्या ताकदीला पुन्हा एकदा मंच मिळावा, हीच या पंचविशीची खरी जाणीव आहे. महाराष्ट्र सारस्वताची ज्योत ही निरंतर तेवतच आहे. त्या ज्योतीची परंपरा जपण्याचा हा माझा छोटासा पण मनापासून केलेला प्रयत्न.

हे लक्षात ठेवा
कधी : १९ नोव्हेंबर २०२५
केव्हा : संध्याकाळी ५.३०
स्थळ : अश्वमेध सभागृह, कर्वे रस्ता, पुणे
प्रस्तुतीकरण : डॉ. प्रसाद पिंपळखरे
विशेष सहभाग : गायिका शैला दातार
प्रवेश : विनामूल्य (ऐच्छिक देणगी स्वागतार्ह)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bus Accident Video: पुण्यात बसचा थरार! चालक उतरला अन् बस चालू लागली; चालत्या गाडीतून प्रवाशांच्या उड्या

Asim Sarode: अ‍ॅड. असीम सरोदे यांची सनद रद्द करण्यास ‘बीसीआय’ची स्थगिती; आदेशात नेमकं काय म्हटलं?

Mangalwedha News : नगराध्यक्षपदाच्या तीन अर्जासह नगरसेवकाच्या दोन अर्जावरील निकालाची मंगळवेढेकरांना प्रतीक्षा

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT