पुणे

व्यावसायिक मिलेट्स प्रक्रिया कार्यशाळा

CD

पुणे, ता. ८ : आहार व आरोग्यविषयक जागरूकता वाढल्याने भरडधान्ये (मिलेट्स) आता ताटात दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर भरडधान्यांवर प्रक्रिया करून विविध नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा ११ ऑक्टोबरला आयोजिली आहे. यात मिलेट्स म्हणजे काय, महत्त्व, उपयुक्तता, सध्या असणारी गरज व मागणी, पोषक गुणधर्म याबाबत माहिती दिली जाणार आहे. पराठा, उपमा, लापशी, खीर, पीठ, लाडू, नमकीन, पुलाव, इडली, डोसा, कुकीज, ढोकळा, स्वीट व बर्फी, प्रोटीन पावडर, चिवडा इत्यादी मिलेट्सचे विविध पदार्थ शिकवण्यात येतील. मिलेट व्यवसायाला असणारे महत्त्व, पॅकिंग, ब्रॅण्डिंग, मशिनरी, प्रकल्प, उत्पादन व बाजार खर्च, विक्रीच्या पद्धती आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे.

अन्नसेवा उद्योग कार्यशाळा
अन्नसेवा उद्योगातील उद्योजक, हॉटेल/रेस्टॉरंट मालक आणि नवउद्योजकांसाठी ऑनलाइन कार्यशाळा ११ ऑक्टोबरपासून आयोजिली आहे. यामध्ये हॉटेल, कॅफे, क्लाऊड किचन व ढाबा व्यवसायाचे नियोजन, ब्रँडिंग, स्थान धोरण, कर्मचारी धोरण, किचन व फ्लोअर व्यवस्थापन, विपणन व ग्राहक व्यवहारांविषयी मार्गदर्शन करण्यात येईल. पारंपरिक व आधुनिक व्यवसायातील बदल, तंत्रज्ञानाचा वापर, खर्चाचे नियोजन व शाश्वत व्यवसाय प्रारूप तयार करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. तसेच हॉटेल/रेस्टॉरंट व्यवसाय सुरू करताना आवश्यक २१ महत्त्वाचे टप्पे, क्लाऊड किचन, स्विगी व झोमॅटोची कार्यप्रणाली, कमिशन व नफा वाढीचे तंत्र, फूड स्टॉल्स, ढाबा व कॅफे आदींद्वारे स्थानिक स्तरावर प्रभावी व्यवसाय कसा उभारायचा, स्टाफिंग, किचन लेआउट, पीओएस प्रणाली, इन्व्हेंटरी व फायनान्स नियोजन, फ्रँचायझी मॉडेल आदींबाबतही मार्गदर्शन होणार आहे.

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १२ ऑक्टोबरला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंट यांच्यासाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.

शेवगा लागवड, उत्पादन व निर्यात संधी
स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात नियमित मागणी असणाऱ्या शेवग्याचा आयुर्वेद औषधींमध्येही वापर वाढला आहे. शेवगा पिकाच्या आधुनिक लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व निर्यात व्यवस्थापनाबाबत माहिती करून देणारी कार्यशाळा १२ ऑक्टोबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत निर्यातक्षम शेवगा उत्पादन पद्धती, आधुनिक जाती, खत व पाणी व्यवस्थापन, छाटणी, फुलोरा अवस्था, काढणी व्यवस्थापन, निर्यातीच्या संधी, निकष, ट्रेसिबिलीटी, शेवगा निर्यातीसाठी गुणवत्तेची पडताळणी, शेवगा निर्यातीसाठी परकीय बाजारपेठ, निर्यातीसाठी शेंगांचा देठ किती व कसा ठेवावा, रसायनमुक्त उत्पादन, निर्यातीसाठी कागदपत्रांची पूर्तता, देशनिहाय निर्यातीचे नियम इ. संदर्भात नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: पुणे पोलिसांना लायटर आणि पिस्तूलमधील फरक कळेना? हडपसर पोलिसांकडून कोथरूड पोलिसांचा ‘खोटारडेपणा’ उघड

Mumbai: पात्र झोपडीधारकांऐवजी मृतांना घरे वाटली; झोपु योजनेतील बेदायदेशीर सदनिका वाटपाची चौकशी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

''शबरीमलातील चोरीची सीबीआय चौकशी करा'' भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांची मागणी

Velhe News : लागोपाठ तीन दिवस राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; दहा ते पंधरा पर्यटक किरकोळ जखमी

Bhoom News : दबंग खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध भूमचे पोलीस निरीक्षक वाद पेटणार

SCROLL FOR NEXT