पुणे

रक्षाबंधनामुळे ‘पीएमपी’ला पावणेतीन कोटींची ‘ओवाळणी’

CD

पुणे, ता. १० ः ‘पीएमपी’ प्रशासनाने रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण व भावांसाठी शनिवारी सुमारे दोन हजार बस रस्त्यावर आणल्या. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला असून, शनिवारी एका दिवशी सुमारे १४ लाख प्रवाशांनी प्रवास केला. यातून सुमारे दोन कोटी ७५ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. ‘पीएमपी’ प्रशासनाने यंदा तीन कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले होते, मात्र वाहतूक कोंडी, पाऊस आदी कारणांचा परिणाम प्रवासी उत्पन्न व संख्येवर झाला आहे.
‘पीएमपी’ प्रशासनाने रक्षाबंधनाचे औचित्य साधून सुमारे दोन हजार बस प्रवासी सेवेत उपलब्ध केल्या. यात नेहमीच्या तुलनेत ७५ बसची वाढ करण्यात आली होती. सामान्य दिवशी ‘पीएमपी’च्या सुमारे १७०० बस रस्त्यावर धावतात. रक्षाबंधनाच्या दिवशी मात्र सर्व आगारातील दुरुस्तीसाठी आलेल्या बस व ठेकेदारांच्या अतिरिक्त बसचा वापर करण्यात आला. त्यामुळे बसची संख्या सुमारे दोन हजार झाली.

प्रवाशांची संख्या लक्षात घेत ‘पीएमपी’ प्रशासनाने यंदादेखील रक्षाबंधनासाठी अतिरिक्त बस गाड्या उपलब्ध केल्या होत्या. शनिवारी सुमारे १४ लाख प्रवाशांनी प्रवास केला असून यातून सुमारे पावणेतीन कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Flood: पाऊस थांबला, पूर कायम; अनेक धरणांमधून विसर्ग सुरूच, पिके अद्याप पाण्याखाली

Jayakwadi Dam: अन् पैठणकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास..! ‘जायकवाडी’चा विसर्ग कमी केल्याने दिलासा, व्यवहार पूर्ववत

MP Udayanraje Bhosele: साताऱ्यातील विजयादशमीचा सीमोल्लंघन सोहळा साध्या पद्धतीने करणार: खासदार उदयनराजे भाेसेले; निधी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

Chandrakant Patil: प्राध्यापक भरती महिन्यात मार्गी लावणार; चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदवीप्रदान

Dharashiv Teacher: शिक्षकं देणार पूरग्रस्तासाठी एक कोटी; धाराशिव शिक्षक संघटना समन्व्य समितीचा निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव

SCROLL FOR NEXT