पुणे

महापालिकेकडून साडेअकरा हजार रोपांची लागवड

CD

पुणे, ता. १६ ः राज्य सरकारने महापालिकेस दिलेल्या साडेदहा हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने पूर्ण करत तब्बल साडेअकरा हजारांहून अधिक रोपांची लागवड केली. शहराच्या वेगवेगळ्या भागांत १३ ठिकाणी महापालिकेच्या पथ विभागाने ही लागवड केली.
राज्य सरकारने ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत महापालिकेस १० हजार १०० इतकी रोपे सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लावण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या पथ विभागाकडून वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. कदंब, कडुनिंब, मोहगणी, बकुळ, ताम्हण, कांचन, जांभूळ, सोनचाफा, बहावा, वड, पिंपळ, करंज, चाफा, आंबा, चिंच, सीताअशोक, अर्जुन अशी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. धानोरी येथील बॉम्बे सॅपर्स (३५०० झाडे), विमाननगर येथील अग्निबाझ शाखा (३०००), घोरपडी येथील लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील आरडब्ल्यूए कार्यालय (१०००), बी. टी. कवडे रस्ता, पासपोर्ट ऑफिस रोड, नॉर्थ मेन रोड (प्रत्येकी १०० रोप), मंगलदास रोड, बोट क्‍लब रोड (प्रत्येकी २५०), बंडगार्डन रस्ता (३००), अंडी उबवणी केंद्र ते खडकी रेल्वे स्थानक (४८०), बालेवाडी येथील राधा चौक ते गणराज चौक (५००), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आचार्य आनंद ऋषीजी चौक ते पाषाण सर्कल रस्ता (५१०), औंध रोड विद्यापीठ चौक ते ब्रेमेन चौक (१५३०) अशा वेगवेगळ्या ठिकाणी एकूण ११ हजार ६२० इतक्‍या रोपांची लागवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dahi Handi Festival : सरीवर सर! थरावर थर!! राज्यभरात दहीहंडीचा जल्लोष

INDIA Alliance News : 'मतचोरीच्या' विरोधात 'I.N.D.I.A' आघाडीचा 'मतदार हक्क यात्रा'द्वारे बिहारमध्ये एल्गार!

हसत खेळत असलेली बाई अशी... पुर्णा आजीच्या जाण्याचा प्रेक्षकांनाही बसला धक्का; म्हणाले- मन मानायलाच तयार नाही की...

WhatsApp: एक व्हिडिओ कॉल अन् बँक खाते होईल रिकामे; जाणून घ्या कसा होतोय लेटेस्ट फ्रॉड

Thane Traffic: ठाणेकरांच्या उत्साहाला कोंडीचे ग्रहण, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्गावर वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT