पुणे, ता. १४ : कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास आणि करिअर-केंद्रित प्रशिक्षणासाठी सहकार्य मिळण्याच्या उद्देशाने आणि विद्यार्थ्यांना उद्योग-प्रेरित शिक्षण आणि इंटर्नशिप प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा या उद्देशाने लॅबडॉक्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत सामंजस्य करार केला आहे. हा शैक्षणिक सामंजस्य करारावर प्राचार्या डॉ. मुक्ता करमरकर आणि लॅबडॉक्सचे संचालक अमित कोठारी यांनी सही केली. यावेळी दोन्ही संस्थांच्या शिक्षक समन्वयक आणि प्रतिनिधींची उपस्थित होते.
बाळासाहेब देशमुख पॅनेलचा विजय
पुणे, ता. १४ : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ सेवक सहकारी पतसंस्थेच्या सुमारे २५ वर्षांनंतर पार पडलेल्या संचालक मंडळ निवडणुकीत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनेलने विजय मिळविला. पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले. १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ६ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे १० उमेदवार संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याचे राज्य निवडणूक प्राधिकरण निवडणूक निर्णय अधिकारी भाग्यश्री होळकर यांनी जाहीर केले. बिनविरोध निवड झालेले संचालक दयानंद देशमुख, शशिकांत कांबळे, मनीषा देशमुख, प्रवीण फरांदे तसेच सर्वसाधारण प्रतिनिधी अनंत सावरकर, जनार्दन राखोंडे, विश्वजित चौधरी, आनंद शुक्ल, संतोष मोरे, अजय माने हे संचालकपदी निवडून आले. अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची अंशदान वर्गणी व कर्जमर्यादा वाढविण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करून त्वरित निर्णय घेण्यात येईल, असे बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.
अत्रे यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण
पुणे, ता. १४ : आचार्य अत्रे यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर भवनाजवळील त्यांच्या अर्धपुतळ्याला अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप राऊत व साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पुंडलिक लव्हे, सुहास बोकील, प्रकाश नारके, प्रशांत एकतपुरे, विजय लोणकर, मधुकर राऊत, विठ्ठल गारडी उपस्थित होते. सूत्रसंचालन बबनराव साबळे यांनी केले. आभार हनुमंत टिळेकर यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.